CM Eknath Shinde Saam Digital
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार, कुणाचं नाव देणार; एकनाथ शिंदेंनी सर्व काही सांगितलं!

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sandeep Gawade

नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी आज यशस्वी चाचणी पार पडली. वायुदलाचं सी २९५ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आल आहे. हे विमानतळ सुरू होण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमातळ कधी सुरू होणार, विमानतळाला कुणाचं नावं देणार, यावर आज प्रतिक्रिया दिली.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. त्यावर मुख्यमंत्री यांनी, आम्ही जे बोलतो ते करतो. दि बा पाटील यांनी या गुणपत्रांसाठी संघर्ष केला आहे. त्यांचं योगदान मोठा आहे. इथे हजारो लाखो लोकांना रोजगार मिळाले. इथे आयटी पार्क होतील सेंटर होतील, असं म्हटलं आहे.

आज नवी मुंबईमध्ये अनेक विकास कामांचं लोकार्पण होत आहे. आज आपण तब्बल नऊ वीज प्रकल्प योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत आहोत. इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर युद्ध विमानाचे यशस्वी लँडिंग झालं. दुसरं सुखोई फायटर विमानाचं याचं तिथून उड्डाण झालं.आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे.मुंबई रायगड ठाणे अशा सर्व जिल्ह्यातील एअर ट्रॅफिक कमी करणारा हा प्रकल्प आहे.

सिडको ने घरे बांधली रस्ते केले मात्र माणुसकी जपण्याचा देखील प्रयत्न केला. सिडको ने इर्शाळवाडीत उत्तम कामगिरी करत त्यांना घरे बांधून दिली. त्या दिवशीची आठवण येता कामा नये अशी घटना घडता कामा नये. सिंघल नाव पण डबल स्पीड ने कामं केलं इर्शाळवाडी तील मुलांना नोकऱ्या दिल्या. सिडको ने घरे बांधली रस्ते बांधले पण माणुसकी सुद्धा जपली. इरशाळवाडीमध्ये दरड कोसळून त्यांचे घर बाधित झाले होते त्यांना सिडको ने घरे बांधून दिली आणि घरांच्या चाव्या सुद्धा दिल्या. इर्शाळवाडीतजी घटना घडली तशी घटना आठवणही वाईट आहे, अशी घटना पुन्हा घडली नाही पाहिजे, असं शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT