CM Eknath Shinde Shinde called Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्रीपद सोडणार? मुख्यमंत्री शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला फोन; काय झाली चर्चा?

CM Eknath Shinde Shinde called Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केला आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

एक मोठी बातमी समोर अली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केला आहे, अशी माहिती समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेत माझ्यावरती ही जबाबदारी नकोय, असं म्हटलं होतं. यानंतर कुठेतरी नाराजीचा सूर हा महायुतीतही दिसून आला. महाराष्ट्रात महायुतीचा जो पराभव झाला आहे, याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेत फडणवीस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

याच प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवर संवाद साधताना फडणवीस यांना अशा प्रकारचे कुठलेही पाऊल उचलू नये, असं सांगितलं आहे. महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवली असून महायुती म्हणूनच आपण हा पराभव स्वीकारायला हवा, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

'फडणवीसांच नेत्रुत्व महाराष्ट्रासाठी महत्वाचे'

याचबद्दल बोलता शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर म्हणाले की, ''आम्ही सर्वजण फडणवीस साहेबांसोबत ठामपणे उभे आहोत. आमची मागणी आहे. त्यांच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फडणवीसांच नेत्रुत्व महाराष्ट्रासाठी महत्वाचे. त्यांची महाराष्ट्राला गरज.''

'फडणवीसांना आता कोणतंही काम राहिलं नाही'

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहे की, देवेंद्र फडणवीस यांना जनतेनेच मुक्त केलं आहे. त्यांच्याकडे आता आता कोणतंही काम राहिलं नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT