विनय म्हात्रे
गोपनीय कागदपत्र लीक आणि फोन टॅपिंग प्रकरणातला गुन्हा तर खरा आहे. मात्र आरोपी सापडत नाही म्हणून तपास बंद करण्याची नामुष्की सीबीआयवर आली आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. याचदरम्यान, याच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला , असा गौफ्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फोन टॅपिंग प्रकरणावरून मोठा गौफ्यस्फोट केला आहे . मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारवेळी गिरीश महाजन, नवनीत राणा, कंगना रणौत, नारायण राणे यांना खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करण्यात आला'.
'सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करून देवेंद्र फडणवीस यांनाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता, असा गौफ्यस्फोटही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
'मलाही काही गोष्टी माहिती आहेत, त्यांनाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या गोष्टी खऱ्या आहेत. मात्र आज सीबीआयने 'दूध का दूध, पानी का पानी' करून त्यांना क्लीनचिट दिली आहे, असेही ते म्हणाले.
'सत्तेचा दुरुपयोग कोण करत होत आणि आज कोण कोणावर आरोप करतंय हे उघड झालं असून जनता सगळं बघत आहे. योग्य वेळेला योग्य उत्तर त्यांना दिलं जाईल, असे ते पुढे म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वक्तव्यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, 'मी सुद्धा ऐकलं की, पवारसाहेब सकाळी एक म्हणाले आणि नंतर दुसरं म्हणाले. पवार साहेब मोठे नेते आहेत. परंतु ते जे बोलतात त्याच्या नेमका उलट अर्थ घायचा असतो. मोदी सरकारच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत अजितदादांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे'.
'कालच चंद्रयान ची मोहीम यशस्वी झाली आहे. महासत्तेकडे आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे, त्याकडे एक पाऊल पडलं आहे. जे अजितदादांना पटलं आहे, ते हळूहळू पवार साहेबांना देखील पटेल, असेही शिंदे पुढे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.