eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

राज ठाकरे, नारायण राणेंनी तुम्हाला का सोडलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे, नारायण राणेंनी तुम्हाला का सोडलं? असा सवाल उद्धव ठाकरेंना केला.

Vishal Gangurde

Dasara Melava 2022 : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा दोन दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने बीकेसी मैदानावर भवदिव्य दसरा मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे, नारायण राणेंनी तुम्हाला का सोडलं? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून बीकेसी मैदानातून उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांची आठवण उद्धव ठाकरेंना करून दिली. 'आजपर्यंत राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले, आम्ही सगळे चुकीचे आणि एकटे उद्धव ठाकरे बरोबर कसे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

यावेळी शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, वळवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा अथांग जनसागर दाखवा, खरी शिवसेना कुठे आहे, या प्रश्नाचं उत्तर हिंदुस्थानाला या महासागरानं दिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं खरे वारसदार कोण आहेत, असा प्रश्न आता तुम्हाला पडणार नाही, कारण या प्रश्नाचं उत्तर या गर्दीनं दिलं आहे. मैदानही आम्हाला मिळालं असतं. सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिला होता. पण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे.

'शिवाजी पार्कच्या जागेवर उभा राहण्याचा अधिकार आहे का ? हजारो शिवसैनिकांनी रक्त सांडून पक्ष उभा केला. पण सत्तेसाठी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. पण तुम्ही शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. तुम्ही राष्ट्रवादीच्या तालावर नाचायला लागला. आम्हालाही नाचायला लावलं, असेही ते म्हणाले.

'तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली होती. त्यामुळे हिंदुत्वासाठी आम्ही भूमिका जाहीरपणे घेतली. लोकांचा आशीर्वाद मिळतोय. जर आम्ही चुकलो असतो, बेईमानी केली असती तर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असता का ? ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची ना शिंदेची ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT