शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, शिवसेना फक्त....; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेमकी कुणाची, यावर भाष्य केलं, म्हणाले...
eknath shinde and uddhav Thackeray
eknath shinde and uddhav Thackeray saam tv
Published On

मुंबई : मी आपल्यासमोर नतमस्तक झालो, हा एवढा विराट जनसमुदाय आहे. काही लोकं रात्रीच आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकं आली. मला आपल्यासमोर डोकं टेकावं लागलं. हा एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असला तरी तुमच्या सारखाच एक कार्यकर्ता आहे. हिंदुत्व रक्षणाची भूमिका आम्ही घेतली आहे. मला शेवटचा माणूस दिसत नाही.

कॅमेरा वळवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा अथांग जनसागर दाखवा, खरी शिवसेना कुठे आहे, या प्रश्नाचं उत्तर हिंदुस्थानाला या महासागरानं दिलं आहे. शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीत घेतलेल्या दसरा मेळाव्यात स्पष्ट केलं.

eknath shinde and uddhav Thackeray
पन्नास खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे, उद्धव ठाकरेंनी CM एकनाथ शिंदेंवर डागली तोफ

यावेळी शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, वळवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा अथांग जनसागर दाखवा, खरी शिवसेना कुठे आहे, या प्रश्नाचं उत्तर हिंदुस्थानाला या महासागरानं दिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं खरे वारसदार कोण आहेत, असा प्रश्न आता तुम्हाला पडणार नाही, कारण या प्रश्नाचं उत्तर या गर्दीनं दिलं आहे. मैदानही आम्हाला मिळालं असतं. सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिला होता. पण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे.

सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचारांना मुठमाती तुम्ही दिली. त्यांच्या विचारांन तिलांजली तुम्ही दिली. हजारो शिवसैनिकांनी आपलं घाम, रक्त सांडवून जी शिवसेना उभी केली, तो तुम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण टाकला, त्यांच्या तालावर तुम्ही नाचलात आणि आम्हालाही नाचवायला लावलात.

eknath shinde and uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंना सांगा इकडे या, आणि....; मग समजेल खरी शिवसेना कुणाची, शहाजीबापू पाटील कडाडले

बाळासाहेबांकडे रिमोट कंट्रोल होता. त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती. म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी आणि हिंदुत्व राखण्यासाठी आम्ही ही भूमिला घेतली. जर आम्ही बेईमानी केली असती तर तुम्ही एवढ्या संख्येनं उपस्थित राहिले का? ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे.

eknath shinde and uddhav Thackeray
गद्दारांनी उद्धव साहेबांना राजगादीवरून खाली उतरवलं, भास्कर जाधवांचा शिंदे गटावर हल्लाबोल

बाळासाहेबांचे खरे वारसदार विचारांचे खरे वारसदार आहे, वारसा हा विचारांचा असतो.तो जपायचा असतो . आम्ही बाळासाहेबांचा विचारांचा वारसा जपला आहे. आम्हाला गेल्या दोन महिन्यात गद्दार आणि खोके एवढच बोलतात. हो गद्दारी झालीय पण ती २०१९ ला गद्दारी झालीय. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली. हिंदुत्वाशी गद्दारी केली. मतदारांसोबत गद्दारी केली.

निवडणुकीला बाळासाहेबांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला. पण त्यानंतर तुम्ही युती तोडली आणि गद्दारी केली. आम्ही गद्दारी केली नाही तर हा गदर आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणतात, मी छाती ठोकपणे सांगू शकतो, तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com