पन्नास खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे, उद्धव ठाकरेंनी CM एकनाथ शिंदेंवर डागली तोफ

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यात गर्भीत इशारा दिला आहे.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई : मी भारावून गेलो आहे. तुमचं हे प्रेम पाहिल्यावर शब्द सूचत नाहीत. हे ओरबाडून घेता येत नाहीत. याच शिवतीर्थावर मी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून मी नतमस्तक झालो होतो. पण तुमच्या समोर नतमस्तक झाल्याशिवास मी पुढे जाऊ शकत नाहीत. आई जगदंबेचं जीवंत संरक्षक कवच मिळालं आहे. यांना मी गद्दारच म्हणणार, कपाळावर गद्दाराचा शिक्का या जन्मी तरी पुसता येणार नाही. ह्यांची मंत्रिपदं थोड्या दिवसांपूर्ती आहेत.

आज हे शिवतीर्थ बघितल्यानंतर प्रश्न पडला आता या गद्दारांचं कसं होणार, इथे एक सुद्धा माणूस भाड्याने आणला नाही, इथे बुजूर्ग लोकं आले आहेत. दिव्यांग लोकं आहेत. इथे सगळे एकनिष्ठ आले आहेत. ही ठाकरे कुटुंबांची कमाई आहे. दरवर्षी पंरपरेप्रमाणे रावण दहन होणार आहे. पण आता रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावणही बदलतो. पन्नास खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे, अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
उद्धव ठाकरेंना सांगा इकडे या, आणि....; मग समजेल खरी शिवसेना कुणाची, शहाजीबापू पाटील कडाडले

त्यांना कुणाला कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही. हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. विचित्र गोष्ट अशी आहे, ज्यांना आपण सगळं दिलं. मंत्रिपदं दिल, आमदार, खासदारकी दिली, ते सोडून गेले. आणि ज्यांना काही दिलं नाही ते निष्ठेने माझ्या पाठीशी आहे. जो पर्यंत तुम्ही शिवसेनेत आहात मी पक्षप्रमुख आहे. पण एकाने जरी सांगितलं गेट आऊट, तर मी खाली उतरून जाईल, पण गद्दारांनी नाही. बाप मंत्री, पोरगा खासदार आणि नातू आताच नगरसेवक, अशा शब्दात शिंदे यांना ठाकरे यांनी टोला लगावला.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
गद्दारांनी उद्धव साहेबांना राजगादीवरून खाली उतरवलं, भास्कर जाधवांचा शिंदे गटावर हल्लाबोल

ठाकरे पुढे म्हणाले, भाजपने धोका दिला म्हणून मी महाविकास आघाडी केली होती. जेव्हा मी शपथ घेतली तेव्हा सात जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता. अमित शहा बोलले होते असं काहीच ठरलं होत. मी आई-वडिलांची शपथ घेवून सांगतो भाजपसोबत अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं. माणसाची हाव किती असते. तुला सगळं दिलं. मंत्रिपदं दिलं आणि आता शिवसेना प्रमुख व्हायचंय. आहे का याची औकात. बाप चोरणारी औलाद. बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागायची. आनंद दिघे एकनिष्ठ होते, जाताना सु्द्धा ते भगव्यातून गेले, असंही ठाकरे म्हणाले.

शिवाजी पार्क मिळू नेय म्हणून हे मागे लागलेत. कोर्टात गेल्यावर सांगतात मी ठरवलं असतं तर ह्यांना शिवाजी पार्क मैदान मिळवून दिलं नसतं. तुमच्या बापाची पेंड आहे का, तुम्ही भाजपची स्क्रीप्ट न घेता भाषण करायचं, कधीही माझ्या हातातून माईक खेचला नव्हता. ह्यांची अवस्था तुम्ही पाहिली आहे.मी शिवसेना प्रमुखांचं वचन पूर्ण केलं आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं नामकरण करायचं होतं, त्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पाठींबा दिला. माझ्यासोबत जायचं असेल तर निखाऱ्यावरून जावं लागेल, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com