Cm Eknath Shinde On Maratha Reservation Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा समाजाने आरक्षणासंदर्भातील आंदोलन मागे घ्यावे, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

Cm Eknath Shinde : मराठा समजला आरक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

साम टिव्ही ब्युरो

Cm Eknath Shinde On Maratha Reservation:

मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल, असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही शासनाची भूमिका आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून या मोहिमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

मराठा समजला आरक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट हे स्वच्छता मोहीमेचे यश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून या मोहिमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहिमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी ३५० वरून १०० ते ८- पर्यंत खाली आली आहे. हे या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे यश आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.  (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक लोकचळवळ झाली आहे. टप्प्या- टप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहिमेच्या माध्यमातून लवकरच स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्र होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्याला देशातील सर्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज कुर्ला येथील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारी आहेत. दिवस-रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचेही सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडकी बहीणचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

SCROLL FOR NEXT