CM Eknath Shinde maratha reservation in maharashtra latest updates Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan: मुख्यमंत्री शिंदेंचा एक डाव अन् मराठ्यांचं वादळ शांत; मुंबईत मध्यरात्री काय-काय घडलं?

CM Eknath Shinde News: मनोज जरांगे यांच्या मागण्यावर मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली. त्यानंतर मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात.

Satish Daud

CM Eknath Shinde on Maratha reservation

मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर धडकल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटचा डाव टाकत शुक्रवारी (२६ जानेवारी) तातडीने शिष्टमंडळाची बैठक बोलावली. मनोज जरांगे यांच्या मागण्यावर मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली. त्यानंतर मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्रभर वर्षा बंगल्यासह मुंबईत प्रशासकीय अधिकारी, पोलीस, तसेच शिष्टमंडळाची धावपळ सुरू होती. अखेर राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी नवी मुंबईत दाखल झालं. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून जरांगे यांच्यासोबत संपर्क देखील साधला. शनिवारी पहाटे राज्य सरकारने काढलेला नवीन अध्यादेश तुमच्याकडे सुपूर्त केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिला. आपल्या मागण्या मान्य झाल्याचं कळताच मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी जल्लोष सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारमधील दोन मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा शुक्रवारी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले होते. दोघांनी जरांगे यांच्यासोबत जवळपास तासभर चर्चा केली. (Latest Marathi News)

मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे दोन्ही मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितले. त्यानंतर शनिवारी पहाटेच अध्यादेश काढण्यात आला. दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेली सर्व कागपत्रे तपासून पाहिली. त्यानंतर उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे, अशी विनंती केली.

मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगे यांच्या विनंतीला मान दिला. त्यानुसार, आज म्हणजेच शनिवारी सकाळी मुख्यमंत्री जरांगे यांच्या भेटीला जाणार असून त्यांचे उपोषण सोडवणार आहेत. यानंतर वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT