Manoj Jarange Mumbai March  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Maratha Andolan: मनोज जरांगेंचं मुंबईतील मराठा आंदोलन संपणार? मुख्यमंत्री शिंदेंची 'ती' चाल यशस्वी!

Maratha Andolan Latest News: मी राज्य सरकारचा जीआर वाशी येथील सभेतून दुपारी २ वाजता वाचून दाखवणार, असंही जरांगे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकारच्या जीआरमध्ये नेमकं आहे तरी काय? याचीच उत्सुकता मराठा समाजाला लागली आहे.

Satish Daud

Mumbai Andolan Latest News

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर धडकले. राज्यभरातून लाखो मराठा बांधव नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. आंदोलकांची संख्या पाहून सरकारने देखील धास्ती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाठवले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्या सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) लवकरच आपलं मुंबईतील आंदोलन मागे घेणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे.

दुसरीकडे मराठा समाजाला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. मी राज्य सरकारचा जीआर वाशी येथील सभेतून दुपारी २ वाजता वाचून दाखवणार, असंही जरांगे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकारच्या जीआरमध्ये नेमकं आहे तरी काय? याचीच उत्सुकता मराठा समाजाला लागली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदेंची चाल यशस्वी?

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटचा डाव टाकला. मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाठवलं. इतकंच नाही, तर त्यांनी जरांगे यांच्या अनेक मागण्या देखील मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जरांगे यांच्या हातात सरकारचा जीआर पडताच मराठा आंदोलक शांत झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पहिली चाल यशस्वी ठरली. आता ते स्वत: मराठा मोर्चाला सामोरे जात सुधारित जीआर जरांगे यांच्या हाती देणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यानंतर मुंबईतील आंदोलन स्थगित झाल्याचे घोषित करण्यात येईल, असे जवळपास निश्चित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT