Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात; सरकारमधील बड्या मंत्र्यांची माहिती

Maratha Reservation News: मराठा आरक्षणासंदर्भात नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Maratha Reservation Mumbai Andolan Latest Marathi News
Maratha Reservation Mumbai Andolan Latest Marathi NewsSaam TV
Published On

Maratha Reservation Mumbai Andolan

मराठा आरक्षणासंदर्भात नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली आहे. आता ते महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, असंही केसरकर यांनी माध्यमांना सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमका काय निर्णय घेणार याकडेच संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलनाविषयी आपली भूमिका जाहीर करणार आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation Mumbai Andolan Latest Marathi News
Manoj Jarange Health: मोठी बातमी! नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; पायाला सूज, तापही भरला

सरकारच्या शिष्टमंडळासोबत आपली नेमकी काय चर्चा झाली. नवीन जीआरमध्ये नेमकं काय आहे? याबाबतची माहिती मनोज जरांगे जाहीर सभेतून मराठा बांधवाना वाचून दाखवणार आहे. यापूर्वी देखील सरकारने अनेक जीआर सरकारने मनोज जरांगेंना पाठवले होते.

मात्र, प्रत्येक वेळी जरांगे यांनी जीआरमध्ये त्रुटी आहे, असं सांगत त्या सुधारण्याची सरकारला विनंती केली होती. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला होता. आता मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही शासकीय विहित नियमानुसार होत असते, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं, की आतापर्यंत आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता यापुढे ही संख्या ५० लाखांच्या वर जाणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गुरुवारी (२५ जानेवारी) लोणावळ्यात देखील सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहचले होते. मात्र, त्यावेळी जरांगे यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता राज्य सरकार आणि सरकारच्या शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जरांगे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमका काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे.

सध्या राज्यभरातून अनेक मराठा बांधव नवी मुंबईत दाखल झाले आहेत. एपीएमसी मार्केटला छावणीचे स्वरुप आलं आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील, जी भूमिका जाहीर करतील ते आम्हाला मान्य आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं आंदोलकांनी ठामपणे सांगितलं आहे.

Maratha Reservation Mumbai Andolan Latest Marathi News
VIDEO: ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला, सुसाट कारने दोघांना उडवलं; संभाजीनगरमधील थरारक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com