eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde : कामाख्ख्या देवीकडे कोणता नवस करणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

राज्यातील राजकीय भूकंपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह आज गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Ekath Shinde Group Guwahati Tour : राज्यातील राजकीय भूकंपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह आज गुवाहाटीला रवाना झाले आहेत. गुवाहाटीला जाऊन ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, गुवाहाटीला जाण्यापूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. राज्यातल्या जनतेसाठीच आम्ही गुवाहाटीला जातोय, बाकी आमचा दुसरा कोणताही अजेंडा नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  बोलताना म्हणाले की, आम्ही गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहोत. आपण गुवाहाटीला जाऊन कामाख्ख्या देवीचं दर्शन घ्यावं, अशी सर्व समर्थक आमदार खासदार तसेच मंत्र्याची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही हा दौरा नियोजित केला आहे. आम्ही हे सर्व राज्यासाठी करत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कामाख्ख्या देवीकडे काय मागणार?

'राज्यातल्या बळीराजाला चांगले दिवस येऊ देत. राज्यातली जनता सुखी होऊ देत. राज्यावर आलेली संकट अनिष्ट दूर होऊ देत यासाठी आमचा प्रयत्न असतो. तिकडे जाण्याचा आमचा कोणताही अजेंडा नाही. राज्यातल्या जनता सुखी राहू देत. राज्यातली अतिवृष्टी, संकट टळू देत राज्याच्या जनतेला सुखी ठेव यासाठी आम्ही देवीकडे प्रार्थना करणार आहोत', असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आजी-माजी आमदार, खासदार त्यांचे कुटुंबीय असे जवळपास 178 सदस्य विषेश विमानाने गुवाहटीला रवाना झाले आहेत. गुवाहाटी विमानतळावर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान त्यांचे आगमन होईल. दरम्यान, शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर विधासभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

"ते कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले आहेत. काही ठिकाणी आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो. तसं तिथं रेडा कापला जातो म्हणतात. रेड्याचा बळी देतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही. पण जर दर्शनाच्या कामाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो”, असं अजित पवार म्हणाले होते.

Edited By -Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Shani Yuti: दिवाळीपूर्वी शनी-शुक्र बनवणार दुर्मिळ संयोग; करियर आणि बिझनेसमध्ये होणार लाभ

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT