VIDEO : २६/११ मधील शहिदांना चप्पल घालून अभिवादन; राज्यपालांच्या कृतीने नव्या वादाला फोडणी?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Saam tv
Published On

Bhagat Singh Koshyari Latest News : गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, कोश्यारी यांनी २६/११ मधील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलं आहे. राज्यपालांच्या या कृतीने आणखी एका वादाला निमंत्रण मिळालं आहे. (Latest Marathi News)

Bhagat Singh Koshyari
Eknath Shinde: राज्यातल्या जनतेसाठीच गुवाहाटीला जातोय; आमचा दुसरा कोणताही अजेंडा नाही

नेमकं काय घडलं?

मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यात आज १४ वर्ष पूर्ण झाली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांना अभिवादन केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चप्पल घालून शहिदांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केलं. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चप्पल काढून शहिदांना अभिवादन केलं.

तर दुसरीकडे राज्यपालांनी थेट चप्पल घालून शहिदांना अभिवादन केल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या कृतीची भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी सारवासारव केली. 'आम्ही शहिदांना अभिवादन करत असताना पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं, चप्पल घालून किंवा काढून अभिवादन करू शकता, त्यामुळेच राज्यपालांची चप्पल काढली नाही, असं लोढा यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या वक्तव्यामुळे विरोधकांनी राज्यपालांसह भाजपला धारेवर धरलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

Bhagat Singh Koshyari
Petrol Diesel Price : खुशखबर! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

कोश्यारींचं राज्यपालपद जाणार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीकडून वारंवार वारंवार केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील भाजप नेत्यांना देखील टीकेला समोरं जावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्यपाल बदलण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

जर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या विधानांबाबत वरिष्ठांसोबत चर्चा केली. तर राज्याला नवे राज्यपाल मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com