CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi Saam Tv
मुंबई/पुणे

CM Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक आरोप

CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत टीका केली.

Priya More
  • देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींच्या दिल्ली आंदोलनावर आरोप

  • ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनावर फडणवीसांची टीका

  • काँग्रेस संविधानिक संस्थांना बदनाम करत असल्याचा आरोप

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा

  • विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केल्याचे विधान

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. काँग्रेसकडून संविधानाला नाकारण्यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यासोबत त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून देखील काँग्रेसवर निशाणा साधला. 'विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण केलं जात आहे', असं ते म्हणाले.

दिल्लीतील आंदोलनावरून काँग्रेसवर आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले की, 'भारतातील संविधानिक संस्थांना बदनाम करणे हा काँग्रेस पक्ष आणि त्यांना साथ देणाऱ्या इतर पक्षांचा उद्देश आहे. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या सर्व संस्था कुचकामी आहेत. त्या काम करू शकत नाहीत. या संस्था न्याय देऊ शकत नाही अशा प्रकारच्या भावना रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकदा का ही भावना रुजली की यांची दुसरी स्टेप असणार की हे संविधानच तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातात घेऊन हा कार्यक्रम सुरू आहे.

विरोधकांकडून षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले की, 'यांना एक्स्ट्रिम लेफ्टिस्ट अशाप्रकारचे राज्य देशात आणायचे आहे. लोकशाही ऐवजी एक्स्ट्रिम लेफ्टिस्ट अशी रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचे षडयंत्र म्हणजे भारतातील सर्व लोकशाही संस्था संपवा अशा प्रकारचे काम यांच्याकडून सुरू आहे. भारताच्या संविधानाला नाकारणं यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. हे आंदोलन त्याचाच एक भाग आहे. हातात संविधान घेऊन असंविधानिक कृती केली जात आहे. संविधानाच्या संस्था डिस्क्रेडिट करण्याचा यांचा डाव सध्या सुरू आहे.'

मुंबईतील आदिवासी आंदोलनावरून देखील फडणवीसांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'मुंबईतील पोलिसांवर धादांत खोटे आरोप केले जात आहेत. मुंबईचे पोलिस प्रोफेशनल आहेत ते कुणावरही अशी कारवाई करत नाहीत. काल आदिवासी शिष्टमंडळाने मागण्या मान्य झाल्याने माझे अभिनंदन करत जल्लोष केला होता. एनएसयूईचे पदाधिकारी आंदोलन संपू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. पण जे खरे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की मागण्या मान्य झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण केले जात आहे. अराजकता निर्माण करण्याच प्रयत्न केला जात आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न जेन्यून आहेत. राज्य सरकार त्यांचे प्रश्न सोडवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ

Maharashtra News Live Update: निवडणूक आयुक्त आम्हाला का भेटत नाहीत? राहुल गांधींचा सवाल

Pune : हिरवाईने नटलेली नऱ्हे टेकडी, फुलपाखरांचं जग; पुण्यात लपलंय 'हे' सुंदर लोकेशन |PHOTOS

शेतकऱ्यांचा आधारवड हरपला! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन; राजकारणासह कृषिक्षेत्रात शोककळा

Eye Health : सकाळी उठल्यावर तुमच्याही डोळ्यात चिकट घाण जमते का? 'या' गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT