devendra fadnavis  Saam tv
मुंबई/पुणे

विरोधकांनी महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं; महिला आरक्षण विधेयकावरून CM फडणवीसांचा हल्लाबोल

devendra fadnavis on women reservation bill : महिला आरक्षण विधेयकावरून CM फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.

Vishal Gangurde

महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

विरोधकांनी महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली दिल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद केला विरोधकांवर हल्लाबोल

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पडल्याने सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जनतेला संबोधित करत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधकांनी महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महात्मा फुले यांची २०० वी जयंती यंदा होणार आहे. महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम झालं. फक्त भाषणापुरतं महात्मा फुलेंचे नावे घेणारे सर्व पक्ष एक्पोझ झाले आहेत'.

'लोकसभेत तीन विधेयके मांडण्यात आली होती. १३४ वी संविधान दुरुस्ती विधेयक, परीसीमन विधेयक आणि केंद्र शासित प्रदेशांना लागू करण्याचं विधेयक. खरं म्हणजे १९७६ साली डिलिमिटेशन झालं. त्यावेळी संविधान संसोधन करून निर्णय घेतला, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.

'१९७१ सालाची लोकसंख्या गोठवून २००० सालापर्यंत डिलिमिटेशन होणार नाही. या संदर्भात २००२ साली डिलिमिटेशन कमिशन तयार झालं. दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होऊ नये. महाराष्ट्रही त्यातील राज्य आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणली. त्यांच्या अन्याय होऊ नये, यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००२ साली पुन्हा २० वर्षांची वाढ केली. १९७१ सालच्या लोकसंख्येवर २००२ साली राज्यातंर्गत डिलिमिटेशन करण्यात आलं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

'महिला आरक्षणासाठी संविधान संशोधन झालं. सेन्सस आणि डिलिमिटेशनबाबत संविधान संशोधन झालं. याचा अर्थ परवाची विधेयके आली, ती अचानक विधेयके आली नाहीत. २०२३ सालच्या संविधान संशोधनानुसार ही विधेयके आलीत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

SCROLL FOR NEXT