CM Eknath Shinde And Pratap Sarnaik Twitter/@purveshsarnaik
मुंबई/पुणे

दो दिल, एक जान!; दोघांच्या खडाजंगीच्या चर्चेनंतर CM शिंदे-सरनाईकांचा एकत्रित फोटो व्हायरल

सुरज सावंत

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्याच गटातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली असल्याची माहिती सूत्रांनी साम टिव्हीला दिली होती. ओवळा-माजीवाडा मतदारसंघामधून दोघांमध्ये वितृष्ट निर्माण झाली असल्याची माहिती मिळाली होती. शिंदे आणि सरनाईकांमधील हा वाद समोर आल्यानंतर आता या प्रकरणी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनी सावरासावर केली आहे. पुर्वेश सरनाईक यांनी एक ट्विट केलं आहे. यातून मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात सर्वकाही ओके असल्याचं भासवण्यात आलं आहे. (MLA Pratap Sarnaik Latest News)

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांशी भांडण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईत यांचे एकमेकांसोबतचे फोटोज शेयर करण्यात आले आहे. या फोटोंना "!! दो दिल और एक जान है हम !!" असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या सूचक ट्विटमधून मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईक यांच्यात सर्वकाही ओके असल्याचा संदेश देण्यात आला आहे. (Maharashtra News)

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात ज्या गोष्टीमुळे शाब्दिक चकमक झाली ती अशी की, प्रताप सरनाईक यांनी ओवळा-माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराकरिता सोडावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर शिंदेंनी प्रताप सरनाईक यांच्यावर दबाव देखील टाकण्यास सुरूवात केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. शिंदेंची ही मागणी सरनाईकांना मान्य नसल्याने दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. (Latest Marathi News)

प्रताप सरनाईक हे ईडीच्या ताब्यातून सुटले असं वाटत असताना, त्यांना पुन्हा एकदा ईडी चौकशीचा इशारा देण्यात आल्याचं सुद्धा वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांचा ओवळा माजीवाड़ा मतदार संघ भाजपच्या माजी आमदाराला देण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत. प्रताप सरनाईक यांना ही बाब कळताच, त्यांनी थेट शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जाब विचारला. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारलं. एकेकाळचे शिंदे यांचे कट्टर विरोधक प्रताप सरनाईक या बंडात आघाडीवर होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT