cisf jawan dies of heart attack Saam tv
मुंबई/पुणे

CISF जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; डोंबिवली परिसरात हळहळ

cisf jawan dies of heart attack : डोंबिवलीकर सीआयएसएफ जवान बसंत सिंग यांचे हैदराबाद येथे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. डोंबिवलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Vishal Gangurde

हैदराबाद प्रशिक्षणादरम्यान जवानाचा मृत्यू झालाय

जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

देशसेवेत असताना जवानाचा आकस्मिक मृत्यू झाला

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीतून एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. डोंबिवली येथील सीआयएसएफचे जवान बसंत सिंग यांचे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना हैदराबाद येथे घडली. त्यांच्या आकस्मिक निधनाने डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बसंत सिंग हे सीआयएसएफच्या प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले होते. प्रशिक्षणादरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली,मात्र उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव डोंबिवलीत आणण्यात आले. येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक, मित्रपरिवार आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेत कार्यरत असलेल्या जवानाला अखेरचा निरोप देताना वातावरण भावुक झाले होते.

बसंत सिंग यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या या जवानाच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

राजस्थानमधील जवान शहीद

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एका सीआरसीएफ जवान हरिओम हवलदार यांच्या पार्थिवाला शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये ड्युटीदरम्यान त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी लागून त्यांचं निधन झालं. जवान हरिओम सीआरपीएफच्या कंपनीला पहारा देत होते.

बसंत सिंग यांचं घर कुठे होते ?

ते डोंबिवलीचे रहिवासी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT