Navi Mumbai Cidco Lottery 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Cidco Lottery 2024 : नवी मुंबईत मिळणार हक्काचं घर, तब्बल 902 घरांसाठी सिडकोची सोडत, असा करा अर्ज

Navi Mumbai Cidco Lottery 2024 : दहीहंडीच्या मुहूर्तावर सिडकोने नवी मुंबईत 902 घरांची सोडत जाहीर केली आहे. आज मंगळवारपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे.

Satish Daud

तुम्ही जर नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, सिडकोने नवी मुंबईत तब्बल 902 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. दहीहंडीच्या मुहूर्तावर ही सोडत जाहीर करण्यात आली असून आज मंगळवारपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे. तर 10 ऑक्टोबर रोजी घरांची ऑनलाइन सोडत काढली जाणार आहे. सिडकोच्या संबंधित विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

नवी मुंबईत मिळणार हक्काचं घर

सिडकोच्या या नव्या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमध्ये तब्बल 213 सदनिका आणि खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांत 689 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आज 27 ऑगस्टपासून लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधील 213 सदनिकांपैकी 38 सदनिका या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्‍या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 175 सदनिका उपलब्ध आहेत.

सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील 689 घरांपैकी 128 घरे मध्यम उत्पन्न गटासाठी आणि 42 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय 359 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बामणडोंगरी परिसरात 100 दुकानांसाठी सोडत

दुसरीकडे बामणडोंगरी स्थानक परिसरातील गृहसंकुलातील 100 दुकानांच्या विक्रीसाठी देखील सिडकोने योजना जाहीर केली आहे. यासाठी येत्या 30 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वीच सिडकोने याच गृहसंकुलातील २४३ दुकानांची योजना जाहीर केली होती. त्याला नवी मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

दरम्यान, उलवे नोडमध्ये सिडकोने अत्यंत उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचबरोबर या दुकानांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नजीक असल्यामुळे या परिसराला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी सिडकोची योजना फायदेशीर असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT