पुणे पोलिसांचं कौतुकच... पण पूजा चव्हाण प्रकरणाचं काय ? Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे पोलिसांचं कौतुकच... पण पूजा चव्हाण प्रकरणाचं काय ?

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. वानवडी बलात्कार प्रकरण संदर्भात माहिती घेत त्यांनी पुणे पोलिसांचं कौतुक केलं. तर पूजा चव्हाण च्या प्रकरणातही असाच तपास का केला नाही असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : भाजप BJP महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ Chitra Wagh यांनी आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन वानवडी बलात्कार प्रकरण Wanwadi Rape Case संदर्भात माहिती घेतली पुणे पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास केला असून, पुणे पोलिसांचे Pune city Police चित्रा वाघ यांनी कौतुक केलं तर पूजा चव्हाण च्या प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

बीडमध्ये सध्या गुंडाराज चालू आहे;

तसेच करुणा शर्मा प्रकरणाबद्दल बोलत असताना चित्र वाघ म्हणाल्या की, बीडमध्ये सध्या गुंडाराज चालू आहे. पोलिसांनी जी कारवाई केली ती कोणत्या आधारे गेली याची माहिती पोलिसांनी देणे गरजेचे आहे. सत्तेचा गैरवापर करुणा शर्मा बाबतीत झाला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

गौरी गायकवाड मारहाण प्रकरणाची सीसीटीव्ही देऊन चौकशी करा;

तसेच पुण्यातील कदमवाकवस्ती या ठिकाणी सरपंच गौरी गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी सुजित काळभोर यांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. मारहाण झाली त्याबाबत वेगवेगळे खुलासे सध्या केले जात आहेत. पूर्ण सीसीटीव्ही देऊन या प्रकरणाची चौकशी करावी जर एखादा पुरुष महिलेला मारहाण करत असेल तर महिला गप्प बसणार नाही आणि कदमवाकवस्ती या ठिकाणचं लसीकरण केंद्र का बंद केलं गेलं याचे उत्तर अजित पवारांनी द्याव अजित पवार यांचं काम करण्याची पद्धत पूर्णतः मला माहित आहे. त्यामुळे दादांनी या प्रकरणात लक्ष घाला व यात कुठलाही राजकारण केलं गेलं नाही किंवा गौरी गायकवाड ही भाजपची ही नाही. त्यामुळे या प्रकाणाबद्दल चौकशीची मागणी त्यांनी केली.

पूजाचा संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत;

पूजा तडस तिच्याबरोबर माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे. पूजाचा संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तडस यांचा हा घरगुती वाद आहे. तो समोर आला कसा यात कुठलेही राजकारण केलं जातं नाही, असे त्या म्हणाल्या.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT