Rahul kalate filed Independent candidature in Chinchwad  saam tv
मुंबई/पुणे

Rahul kalate : राहुल कलाटेंनी वाढवलं राष्ट्रवादीचं टेंशन! चिंचवडमधून अपक्ष अर्ज दाखल

Rahul kalate : राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादीचं टेंशन वाढवलंय. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गोपाल मोटघरे

Chinchwad Bypoll: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेच्या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकासआघाडीतर्फे राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

परंतु आता राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादीचं टेंशन वाढवलं आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत कलाटे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. मी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढणारच असा निर्धार राहुल कलाटे यांनी यावेळी व्यक्त केला. (Latest Marathi News)

राहुल कलाटे म्हणाले की, चिंचवडच्या जनतेने 2019 च्या निवडणुकीमध्ये माझ्यावर खूप विश्वास दाखवला. त्यावेळी माझ्यावर प्रेम करणारी जनता या पोटनिवडणुकीतही माझ्या पाठिशाी उभी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चिंचवड मतदार संघातील जनता कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहिली नाही, त्यामुळे ह्या निवडणुकीत देखील चिंचवडची जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहणार नाही असा दावा देखील कलाटे यांनी केला आहे. तसेच ही निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढणारच असा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना लक्ष्मण जगताप यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा दावाही कायम आहे. परंतु राष्ट्रवादीने या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे या जागेवर इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT