Pune Crime Saam TV
मुंबई/पुणे

संतापजनक : ख्रिश्चन धर्मगुरूकडून बालकावर लैंगिक अत्याचार; Posco अंतर्गत गुन्हा दाखल

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यातील (Pune) ख्रिश्चन धर्मगुरूने एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्ररकणी धर्मगुरुविरोधात बाल अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मुख्य आरोपीविरोधात केलेल्या तक्रारीकडे त्यांच्या वरिष्ठ धर्मगुरुंनी दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून पुणे जिल्ह्याचे प्रमुख धर्मगुरू (Christian priest) बिशप थॉमस डाबरे आणि मुंबईतील प्रमुख धर्मगृरु आर्च बिशप ऑजवर्ल्ड ग्रासेस यांच्या विरोधात देखील बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मात्र, या प्रकरणात आता पुणे न्यायालयाने मुख्य आरोपी विनसेन्ट परेरा याला जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोती भापकर आणि RTI कार्यकर्ते डॉमनिक लोबो यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पुण्यातील हडपसर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी विनसेन्ट परेरा याने त्याच्या ओळखीच्या कुटुंबातील मुलासोबत लैंगिक चाळे केले ज्यामुळे तो पीडित मुलगा घाबरला आणि त्याला मानसिक धक्का बसला ही बाब जेव्हा पीडित मुलाच्या पालकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आरोपी विन्सेटचे वरिष्ठ असलेल्या पुणे जिल्ह्याचे प्रमुख,

थॉमस डाबरे यांच्याकडे तसेचं सर्व राज्यातील सर्व ख्रिश्चन धर्मगुरूंचे प्रमुख असलेल्या मुंबईतील प्रमुख धर्मगुरू आर्च बिशप ओजवर्ल्ड ग्रासेस यांच्याकडे देखील तक्रार केली. मात्र, दोघांकडून देखील तक्रारीची दखल न घेता आरोपी विनसेन्ट परेराच्या कृष्ण कृत्याडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे अतिशय संवेदनशील असलेल्या अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याची बाब मारोती भापकर यांना समजली आणि त्यांनी संबधिताविरोधात कायदेशीर तक्रार नोंदवली.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या आधी देखील मुख्य आरोपी विनसेन्ट परेराला पोक्सो कायद्याअंतर्गत झालेल्या कारवाईत तब्बल दीड वर्ष जेलची हवा खावी लागली होती, त्यानंतरही परेराने पून्हा त्याचं प्रकारच गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलीस आता आरोपी परेरा आणि त्याच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विरोधात काही कारवाई करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT