CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

CM Uddhav Thackeray: मुख्यंमंत्री पुन्हा येणार! शिवाजी पार्कवर प्रत्यक्षात हजर राहणार...

साम टिव्ही

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. १२ नोव्हेंबरला झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिसीद्वारे (Video Conference) बैठका आणि कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. (Chief Minister Uddhav Thackeray will actually be present at Shivaji Park)

हे देखील पहा -

१२ नोव्हेंबरला एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सर्जरी झाली होती आणि २ डिसेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज मिळाल्यापासून ते आजपर्यंत ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी नव्हते. मात्र उद्या ते २६ जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रत्यक्षपणे उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री कुठे आहेत? असा वारंवार सवाल करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिलं होतं. "मी घराबाहेर पडलो नसलो तरी मी असमर्थ आहे असं नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं होतं. मुंबई महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन ऑनलाइन स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, "गेल्या काही काळामध्ये एका शस्त्रक्रियेला मला समोरं जावं लागलं. त्यानंतर मी अजूनही तसा घराबाहेर पडलेलो नाही पण, असं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, मी बाहेर पडायला असमर्थ आहे. मी सुद्धा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तलावर जरी माझ्या हातात नसली तरी तलावर कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं आहे. त्यामुळं जेव्हा फिरवायची त्या योग्यवेळी ती फिरवत आलेलो आहेच आणि यापुढेही फिरवणार आहेच. त्यामुळे आता उद्या मुख्यमंत्री विरोधकांना काय बोलणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

SCROLL FOR NEXT