Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : खातेवाटपावरून एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, चांगलं खातं...

खातेवाटपाच्या नाराजीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून रडखडलेला शिंदे सरकारचा (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर खातेवाटपही झाली. मात्र या खातेवाटपावरून शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहे. कारण, शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला (BJP) चांगली खाती मिळाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, खातेवाटपाच्या नाराजीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. (CM Eknath Shinde Latest News)

खातेवाटपावरून कुणीच नाराज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मंत्र्यांना ज्या खात्याची जबाबदारी दिली आहे ती यशस्वीरित्या पार पाडतील. मंत्री हा एका मतदार संघापुरता मर्यादित नसतो, तर त्याच्याकडे राज्याचा कारभार असतो. त्यामुळे सर्वांगीण विकास कसा होईल याकडे कल असणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

खातेवाटपावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मनाजोगी महत्त्वाची खाती न मिळाल्याने दादा भुसे, संदीपान भुमरे आणि दीपक केसरकर हे नाराज असल्याचं बोललं जातं आहे. बंदरे आणि खनिकर्म हे दुय्यम दर्जाचे खाते दिल्यानं दादा भुसे सर्वाधिक नाराज आहेत. तर दुसरीकडे रोजगार हमी, फलोत्पादन हे जुनेच खाते मिळाल्यानं संदीपान भुमरेही नाराज आहेत. त्यासोबतच शालेय शिक्षण हे खाते मिळूनही दीपक केसरकर हे फारसे खूश नसल्यांच म्हटलं जात आहे. (Eknath Shinde Todays News)

दरम्यान, खाते कोणतेही असो त्याला खऱ्या अर्थाने न्याय देणे महत्वाचे असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीची आठवणच मंत्र्यांना करून दिली आहे. अगोदर मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही म्हणून नाराजी त्यानंतर चांगलं खातं मिळाले नाही म्हणून नाराजी योग्य नाही. पण खातेवाटपावरुन कोणी नाराज नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांना ज्या खात्याची जबाबदारी दिली आहे ती यशस्वीरित्या पार पाडतील. मंत्री हा एका मतदार संघापुरता मर्यादित नसतो तर त्याच्याकडे राज्याचा कारभार असतो. त्यामुळे सर्वांगीण विकास कसा होईल याकडे कल असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT