Eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी! रखडलेल्या जागांच्या नियुक्त्या करण्याचे CM शिंदेंनी दिले आदेश

२०१४ व २०१९ या काळातील नोकर भरतीतील मराठा समाजातील रखडलेल्या जागांच्या नियुक्त्यांचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: २०१४ व २०१९ या काळातील नोकर भरतीतील मराठा समाजातील रखडलेल्या जागांच्या नियुक्त्यांचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत, अशी माहिती स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ.धनंजय जाधव यांनी दिली आहे. आझाद मैदान येथे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या उपोषणाला यश आले आहे. विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळण्यासाठी सुरुवातीपासून मराठा समाजातील विविध संघटना व समन्वयकांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली, असंही डॉ.धनंजय जाधव म्हणाले.

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ.धनंजय जाधव यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भात आझाद मैदान येथे उपोषण केले होते. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रखडलेल्या जागांवर नियुक्त्या करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. धनंजय जाधन यांची फेसबुक पोस्ट

विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळण्यासाठी सुरुवातीपासून मराठा समाजातील विविध संघटना व समन्वयकांनी महत्वपुर्ण भूमिका पार पाडली. छत्रपती संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाच्यावेळी आग्रहीपणे नियुक्त्यांचा प्रश्न मांडण्याची मला संधी मिळाली, त्याचा मला आनंद आहे.

मराठा समाजाच्या भावना समजून घेवून नियुक्त्यांची मागणी करणारे छत्रपती संभाजीराजे, विविध संघटना राजकीय इच्छाशक्ती दाखवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच तत्कालीन सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय देता आला. प्रशासकीय व विधि अधिकारी यांचे देखील मी आभार मानतो.

बहुप्रतिक्षेनंतर नियुक्त होणाऱ्या सर्वच नव अधिकारी व शासकीय नोकरदारांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस "स्वराज्य" संघटनेच्या हार्दिक शुभेच्छा, अशा शुभेच्छा डॉ. धनंजय जाधव यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

MNS Protest: नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधवांना घेतलं ताब्यात|VIDEO

गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्च्याला परवानगी, मराठी लोकांना का नाही? मनसेचा सरकारला संतप्त सवाल, मीरा भाईंदरचे वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT