chief minister Eknath Shinde Group
chief minister Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह अयोध्येला जाणार?

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : नुकतंच शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं. आता लवकरच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिंदुत्वाचा नारा हा आणखीच बुलंद होण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्रीमंडळातील काही मंत्री अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (CM Eknath Shinde Latest News)

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. याच हिंदुत्वाला आणखीच धार देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाऊ शकतात. एकनाथ शिंदे यांनी 90 च्या दशकात कारसेवा केली आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यापासून दूर गेल्यानंतर हिंदुत्वाचा झेंडा हा आपल्याच खांद्यावर आहे हे दाखवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी अयोध्या दौरा महत्वाचा ठरणार आहे. (CM Eknath Shinde News)

महाहिंदुत्व सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे हे अयोध्येत जावून रामलल्लांचं दर्शन घेवू शकतात. आपलंच हिंदुत्व कसं प्रखर आहे असा संदेश हे अयोध्या दौऱ्यातून दाखवून देवू शकतात. विशेष बाब म्हणजे या पूर्वी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदेही अयोध्या दौऱ्यावर जावून राष्ट्रीय राजकारणामध्ये लक्ष वेधून घेऊ शकतात.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Heat Wave: पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

Dhananjay Munde On Uddhav Thackeray | मुंडेंचा फोन ठाकरेंनी टाळला! किस्सा काय?

Kitchen Tips: स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Shubman Gill Statement: पराभवाच्या हॅट्रिकनंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Today's Marathi News Live : बीड बायपास परिसरात टोळक्याची दहशत; कोट्यवधीच्या जमिनीसाठी दुसऱ्यांदा महिलांवर हल्ला

SCROLL FOR NEXT