Eknath Shinde, Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये; शिंदेंचा ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) बंडखोर आमदारांवर निशाणा साधला होता. मतं मागायची असतील तर तुमच्या हिंमतीवर मागवा. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना (Shivsena) प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Eknath Shinde Todays News)

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. 'आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललो आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेनं ते स्वीकारलं आहे. आम्हाला राज्यभरातून, जिल्ह्या जिल्ह्यातून मोठं समर्थन मिळत आहे'. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, 'बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. बाळासाहेब आम्हाला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आशीर्वादानेच हे सरकार स्थापन झालं. अडीच वर्षापूर्वी झालं पाहिजे होतं त्याची आम्ही दुरुस्ती आता केली आहे. भाजपसोबत आमची युती होती. सारखं खंजीर खुपसल्यची भाषा केली जाते, जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकले त्यांनी खंजीरची भाषा करु नये. पाठीत खंजीर कुणी खुपसला हे मी योग्य वेळ आली की सांगेन, असा इशाराही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. (Uddhav Thackeray Latest News)

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

'मराठी माणसाला, हिंदुत्वाला तोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं आणि भाजपचं हिंदुत्व काय ? शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करते, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. इतकंच नाही तर, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली होती.

'अडीच वर्षांचं ठरलं होतं. मग तेव्हा शक्य होत नव्हतं, मग आज कसं शक्य झालं ? आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवायचं आहे. त्यांनी कोणत्या शक्तीशी पंगा घेतला आहे, त्यांना ठाऊक नाही. शिवसेनेने ज्या दगडाला शेंदूर फासला होता, ते गिळायला बसले आहेत. त्यांच्या मागे महाशक्ती आहे, महाशक्ती कळसूत्री आहे, त्यांना शिवसेना संपवायची आहे'

'त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याखेरीज पर्याय नाही. काल एका पक्षाने त्यांना ऑफर दिली आहे. मी पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र फिरणार आहे. त्यांना शिवसेना संपवायची आहे. ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. पण ठाकरे आणि सेना नातं घट्ट राहणार आहे. तुमच्यात मर्दपणा असेल तर माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावावर निवडून येऊ द्या. त्यांनी स्वत: आई-वडिलांना घेऊन महाराष्ट्रात मतं मागा. पक्ष घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता वडिलही घ्यायला चालले आहेत'. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT