eknath shinde  Saamtv
मुंबई/पुणे

Shivsena Shinde Group Candidate List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर, १५ जणांना उमेदवारी; कुणाकुणाला संधी? वाचा

Shinde Group Candidate List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या तिसऱ्या यादीत १५ जणांना उमेदवारी मिळाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची तिसरी यादी समोर आली आहे. शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत १५ जणांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत मित्रपक्षांना दोन जागा दिल्या आहेत. या तिसऱ्या यादीत शायना एनसी यांच्या नावाचाही समावेश आहे.

शिंदे गटाने सोमवारी उशिरा रात्री तिसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ४५ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत २० जणांची यादी जाहीर केली होती. तर शिंदे गटाने तिसऱ्या यादीत १५ जणांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाने तिसऱ्या यादीत २ मित्रपक्षांना जागा दिल्या आहेत.

शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत मुंबईतील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. शायना एनसी यांना मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. शायना एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार

सिंदखेडराजा- शशिकांत खेडेकर

कल्याण ग्रामीण- राजेश मोरे

घनसावंगी- हिकमत उढाण,

कन्नड- संजना जाधव

भांडूप पश्चिम- अशोक पाटील

मुंबादेवी- शायना एनसी

नेवासा- विठ्ठलराव लंघे पाटील

धाराशिव- अजित पिंगळे

संगमनेर- अमोल खताळ

श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे

गुहागर- राजेश बेंडल

करमाळा- दिग्विजय बागल

बार्शी- राजेंद्र राऊत

हातकणंगले- अशोकराव माने (जनसुराज्य पक्ष)

शिरोळ- राजेंद्र पाटील येड्रावकर (राजश्री शाहूविकास आघाडी)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: कळमनुरीत रंगणार चौरंगी लढत? संतोष बांगरांना ठाकरेंच्या टारफेंचं आव्हान

Grah Gochar: मंगळाच्या राशी बदलामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार, धनत्रयोदशीला लागेल धनाचा ढीग!

Lawrence Bishnoi: खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी; कॉलसाठी लॉरेंसने बंद केला होता तुरुंगातील जॅमर

Amit Thackeray: 12.50 कोटींची जंगम मालमत्ता असलेल्या अमित ठाकरेंकडे एकही कार नाही; जाणून घ्या एकूण संपत्ती किती

Maharashtra News Live Updates : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने उमेदवार बदलला, 4 उमेदवारांची शेवटची यादी

SCROLL FOR NEXT