Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal  Saam TV
मुंबई/पुणे

शिवीगाळ केलीच नाही, माझ्या विरोधात खोटा FIR; भुजबळांनी लिहलं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यक्रमात सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. तर भुजबळांनी आपल्याला फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चेंबूर येथील ललित टेकचंदानी या व्यावसायिकाने छगन भुजबळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, आपण ललित टेकचंदानी यांना फोन केला नाही, बोलणे झाले नाही, मेसेजही केले नाही तरी माझ्या विरोधात FIR करण्यात आला असल्याची माहिती छगन भुजबळ एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवली आहे.

पाह व्हिडीओ -

त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे की, सत्यशोधक समाजाच्या कार्यक्रमात देवी सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर व्यावसायिक ललित टेकचांदानी यांनीच आपल्याला WhatsApp वर मेसेज करून त्रास दिला. शिवाय अनोळखी नंबरवरून आपल्यालाच वाईट मेसेज आले होते. हा कोणाचा नंबर आहे. हे आपल्या कार्यकर्त्यांनी चेक केलं असता तो टेकचंदनी यांचा फोन नंबर असल्याचं भुजबळ यांनी पत्रात म्हटलं आहे.

शिवाय आपण या व्यक्तीला मी फोन केला नाही, काही बोललो नाही, शिवीगाळ केली नाही, तरी देखील माझ्या विरोधात FIR करण्यात आली असल्यामुळे सदर प्रकरणाची माहिती घेऊन सहकार्य करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती भुजबळांनी पत्रात केली आहे. दरम्यान, छगन भुजबळांनी आपल्याला मारण्याची धमकी दिल्याचा आरोप व्यावसायिक टेकचंदनी यांनी केला आहे. तर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT