Rohit Pawar Vs Chagan Bhujbal Saam TV
मुंबई/पुणे

NCP Crisis: 'रोहित पवार आईच्या पोटात असताना...'; छगन भुजबळांचा जोरदार पलटवार

Maharashtra Political News: छगन भुजबळांनी रोहित पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळांच्या टीकेला रोहित पवार आता काय प्रत्युत्तर देतात, हे पहावे लागेल.

रोहिदास गाडगे

Chagan Bhujbal News: 'रोहित पवार यांचा जन्म ते आजपर्यंतच्या काळात राज्याच्या राजकारणातील विविध पदावर काम केलं आहे. रोहित पवारांना राजकारणाच्या इतिहासाची अजून समज नसून ते लहान आहेत, असं म्हणत छगन भुजबळांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार गटाने शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरुद्ध टीका करण्यात येत आहे. छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप आणि टीका केली आहे. तर भुजबळांनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिलं होतं. रोहित पवारांच्या टीकेला आता छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यातील राजकीय भूकंपानंतर मोठमोठ्या घडामोडी घडत असताना विरोधकांकडून टीकास्त्र सोडली जात आहे. यावरून छगन भुजबळांनी पलटवार करत राज्यात एवढ्या घडामोडी होत असल्याने प्रत्येकजण चोच्या मारायला पाहणारच असे म्हटले आहे.

'रोहित पवार आईच्या पोटात असताना मी राज्याच्या महत्वाच्या पदावर होतो. रोहित पवारांचा जन्म ते आजपर्यतच्या काळात राज्याच्या राजकारणातील विविध पदावर काम केलं आहे. रोहित पवारांना राजकारणाच्या इतिहासाची अजून समज नाही. त्यामानाने ते लहान आहेत, असं म्हणत भुजबळांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे.

'रोहित पवारांसारखा मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. आम्हाला गॉडफादर कोण नव्हतं, असं म्हणत भुजबळ यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवारांनी आंबेगाव विधानसभा निवडणूक लढवावी आणि पडावे, असा टोलाही त्यांनी लगावला. छगन भुजबळांच्या टीकेनंतर रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT