BLACK & WHITE Chhagan Bhujbal Exclusive Interview Saam Tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal: मनोज जरांगेंवर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च सांगितलं कारण

BLACK & WHITE Chhagan Bhujbal Exclusive Interview: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १९ वा दिवस आहे. त्याच्या उपोषणावर छगन भुजबळ यांनी टीका केली.

Priya More
  • मनोज जरांगेंवर छगन भुजबळांनी केली टीका

  • मनोज जरांगेंबाबत सरकारला स्टँड घ्यावा लागेल

  • छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला

  • समाजाआडून राजकारण करू नका असे शिंदेंनी सांगितले असल्याचे भुजबळ म्हणाले

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर सडकून टीका केली. साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या कार्यक्रमात संपादक निलेश खरे यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून काहीच का बोलत नाही? यावर उत्तर दिलं. यावेळी त्यांनी मनोज जरांगे ऐकत नसेल तर त्यावर सरकारला स्टँड घ्यावा लागेल, असे मत व्यक्त केले.

मनोज जरांगेवर आता का नाही बोलत यावर भुजबळ म्हणाले की, 'ओबीसी समाजाचे यामध्ये प्रचंड नुकसान होत आहे यावर आतापर्यंत मीच बोलत होतो. आता बाकीचे ओबीसी नेते बोलायला लागले आहेत. आतमध्ये काय चालले आहे हे मला माहिती होते. मंत्रालयात एक पत्रकार परिषद घेऊन मी सांगितले की, महायुतीच्या सरकारला ओबीसी समाजाने सर्वात जास्त पाठिंबा दिला. सर्व काही होऊन जर हा व्यक्ती ऐकत नसेल तर सरकारला स्टँड घ्यावा लागणार आहे. स्टँड घ्यावा लागणार असेल तर मी बोलून माझं आणि त्याचं भांडण का करायचे. पण सरकारला कळाले आहे की काय खरं आहे. शिंदे बोलले आहेत की समाजासाठी असेल तर बरोबर आहे. पण समाजाआडून राजकारण करणार असेल तर ते अजिबात चालणार आहे. ते सर्व काही बोलले आहे तर आता मला बोलायची काय गरज आहे?'

मनोज जरांगेंवर त्याचीच माणसं आता आरोप करू लागली आहेत. यावर भुजबळ म्हणाले की, 'मला कल्पना होती की हा मनुष्य ऐकणारा नाही. एक झालं की एक असं करणारा आहे. त्याचा अभ्यास कसालाच नाही. तो मुख्यमंत्र्यांना, शिंदेंना, बावनकुळेंना शिव्या द्यायला लागला. वाटेल ते बोलायला लागला. महिला जिल्हाधिकाऱ्यांना घाणेरडं बोलायला लागला. त्याला बोलयाची देखील संस्कृती नाही. त्यामुळे त्याच्यासोबतची लोकं आता बोलायला लागले आहे की, त्या शिवाजी महाराजांच्या टेबलाखालून तंबाखू दिली जाते तिथेच तो थुंकतो. तो खातो देखील हे त्यांचीच माणसं सांगत आहेत.'

कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील चर्चा झाली की, 'आपण यांना सगळं दिलं. त्याच्याप्रमाणे वागलो सहानुभूती दाखवली. जे जे शक्य आणि अशक्य आहे ते ते दिलं. पण तो सर्वांना शिव्या देतोय. गणपतीमध्ये मागच्यावेळी त्याने काय धिंगाणा घातला हे सर्व जगाने पाहिले. पण हे काय चालले आहे. गणपतीसाठी देश-परदेशातून लोकं येतात. पोलिसांनी त्यांना पाहायचे की याला पाहायचे. म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली.'

छगन भुजबळांनी पुढे सांगितले की, 'कुणबी ०.३ टक्के पण नाही. ऐवढे २-४ नाकारले गेले. त्यापेक्षा कमी आहेत. पण ओबीसीचे देखील नाकारले गेले. एससी-एसटीचे देखील नाकारले गेले. मी अनेक कागदं दाखवली आहेत की, मराठा कु, कु मराठा, मराठी कुणबी असे अनेक कागदं खाडाखोड करून लिहिली आहेत. एका हेडमास्टरने सांगितले की, हे प्रमाणपत्र खोटे आहे. त्यात खाडाखोड आहे. हे प्रमाणपत्र मी मान्य करत नाही. त्यानंतर नवीन नवीन हे गॅझेट झालं ते गॅझेट काढा हे जरांगेकडून सुरूच आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Agreement ते घर खाली करेपर्यंत; भाडेकरूंसाठी ६ नवे नियम, आताच घ्या जाणून

Maharashtra News Live Update: अमरावतीत सर्वोच्च तापमानाची नोंद, ३७ वर्षानंतर ३९.६ अंश तापमान

Street Style PaniPuri: घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल चटपटीत मसालेदार पाणीपुरीचं पाणी!

Best Drinks for Liver Health : लिव्हरच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ 5 बेस्ट ड्रिंक्स; यकृतावरची हट्टी चरबी झटक्यात होईल कमी

Election Result : बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, त्यातही काँग्रेसचा दारूण पराभव, फक्त २ जागा जिंकल्या

SCROLL FOR NEXT