Sadichha Sane Case Saam Tv
मुंबई/पुणे

Sadichha Sane Case: सदिच्छा साने हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल

Crime News : सदिच्छा आणि मिथ्थू हे २९ नोव्हेंबर २०२१ ला रात्री बँडस्टँडवर एकत्र दिसले होते, त्यानंतर ती बेपत्ता झाली.

Shivani Tichkule

सचिन गाड

Sadichha Sane case Update : जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा साने हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून १,७९० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात सुमारे १२५ जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून चार प्रमुख साक्षीदारांची साक्ष महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी मिथ्थू सिंह आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत. मिथ्थू सिंह वांद्रे परिसरात चायनीज खाद्यपदार्थाची विक्री करायचा. सदिच्छा आणि मिथ्थू हे २९ नोव्हेंबर २०२१ ला रात्री बँडस्टँडवर एकत्र दिसले होते, त्यानंतर ती बेपत्ता झाली. सदिच्छा एमबीबीएसच्या (MBBS) तिसऱ्या वर्षाला शिकत होती.

त्या दोघांना शेवटी एकत्र पाहणारे हॉटेलच्या (Hotel) दोन सुरक्षारक्षकांचे व मिथ्थूच्या चायनीज स्टॉलवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचे जबाब सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. या जबाबांचाही आरोपपत्रात समावेश आहे.

याशिवाय दोन्ही आरोपींमधील संभाषण सुरू असताना साक्षीदाराने ऐकले होते. त्यात ते सदिच्छाबाबत चर्चा करत होते. याशिवाय आरोपीने सदिच्छा सानेचा मोबाइल बंद असतानाही सदिच्छाला १३ मिसकॉल केले होते. तसेच स्वतःला वाचवण्यासाठी तिला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. (Crime News)

सदिच्छा बेपत्ता झाल्याच्या रात्री बँडस्टँडवर त्या दोघांनी एकत्र छायाचित्र घेतले होते. तसेच मिथ्थूसारखी दिसणारी एक व्यक्ती टय़ूब फ्लोटसह बँडस्टँडकडे घाईघाईने चालत गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना सापडले आहे. पोलिसांना अद्याप सदिच्छा साने हिचा मृतदेह सापडलेला नाही. मिथ्थू सिंहच्या निवासस्थानातून सापडलेल्या फ्लोट टय़ूबवर आढळलेले रक्ताचे नमुने सदिच्छा सानेचे नसल्याचेही स्पष्ट झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

SCROLL FOR NEXT