Ramtek Bungalow News Saam tv
मुंबई/पुणे

Ramtek Bungalow : रामटेक बंगला का नकोसा? काय आहे रामटेक बंगल्याचा इतिहास? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ramtek Bungalow News : रामटेक बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मिळाला होता. मात्र, त्यांनी धसका घेत बंगला बदलण्याच्या हालचाली सुरु केल्या. अनेक मंत्र्यांना रामटेक नकोसा झाला आहे.

Tanmay Tillu

मुंबई : मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी-फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला...मात्र, याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडत असल्याचं समोर आलंय.. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचं आणि सरकारी बंगल्यांचंही वाटप करण्यात आलं. यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला देण्यात आलाय. मात्र या रामटेक बंगल्याचा बावनकुळेंनी धसका घेत बंगला बदलण्याच्या हालचाली सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..मंत्र्यांना रामटेक का नकोसा झालायं..त्यामागचा वादग्रस्त राजकीय इतिहास काय आहे पाहूया...

रामटेक बंगला का नकोसा?

दीपक केसरकर

2022 मध्ये शालेय शिक्षणमंत्री केसरकरांना रामटेक बंगला

2024 च्या महायुती सरकारमध्ये केसरकरांना मंत्रिपद नाही

छगन भुजबळ

2019 मध्ये मविआ सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

मंत्री असताना छगन भुजबळांचं रामटेकमध्ये वास्तव्य

मविआ सरकार अडीच वर्षात कोसळलं, महायुती सरकारमध्ये मंत्रिपद नाही

एकनाथ खडसे

2014मध्ये युती सरकारमध्ये एकनाथ खडसेंकडे रामटेक बंगला

खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप, खडसेंना सोडावं लागलं मंत्रिपद

मंत्रिपद गेल्यानंतर खडसे राजकारणाच्या मुख्य फळीतूनच बाजुला

छगन भुजबळ

1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री

तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणीत

भुजबळांना द्यावा लागला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

तेलगी घोटाळ्यातून सुटले त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलवारी

रामटेक बंगल्याला असा वादग्रस्त इतिहास असल्यामुळे अनेक मंत्री रामटेक मिळाल्यानंतर नाकं मुरडताना दिसतात. आणि त्यामुळे बावनकुळेंनाही हा बंगला नको असल्याची चर्चा सुरू झालीय. तर दुसरीकडे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना मात्र हा बंगला हवा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कारण दिंवगत गोपीनाथ मुंडे मंत्री असताना याच बंगल्यात वास्तव्याला होते. पंकजा मुंडेंचं या बंगल्याशी भावनिक नातं असल्यामुळे त्यांना हा बंगला हवा असून त्यामुळे बावनकुळेंना बंगला बदलून मिळणार अशीही चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT