फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे, 'सामना'ला किंमत देत नाही - चंद्रकांत पाटील Saam Tv News
मुंबई/पुणे

फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे, 'सामना'ला किंमत देत नाही - चंद्रकांत पाटील

सामन्यातील टीकेला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत ''फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे, 'सामना'ला किंमत देत नाही'' असा टोला शिवसेनेला लगावला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल (CM Uddhav Thackeray) आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) अटक झाली. रात्री उशीरा त्यांना जामीन मंजूर झाला. शिवसेनेच्या (Shivsena) सामना (Saamana) या मुखपत्रातून ''नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा'' अशी बोचरी राणेंवर टीका करण्यात आली तसेच भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर देत ''फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे, 'सामना'ला किंमत देत नाही'' असा टोला लगावला आहे. (chandrakant patil slams to saamana Editorial)

हे देखील पहा -

चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणेंचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले की, राणेंचे वाक्य चुकलं नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. एखादी गोष्ट चुकली तर राणेंना आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था आहे असं ते म्हणाले. तसेच सामनावर टीका करत ''फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे, 'सामना'ला किंमत देत नाही.'' असंही ते म्हणाले आहेत. त्यासोबतच त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. ''राऊत साहेब तुमच्यावर पण आरोप झालेत, त्यावर पण बघा'' असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं असा आरोप त्यांनी केला आहे.

नारायण राणेंबद्दल बोलताना ते म्हणाले की, नारायण राणे जेवत असताना त्यांचं ताट हिसकावून घेतलं हे अमानवीय आहे. आता राणेंना मोकळीक दिली, जामीन मिळाला आहे, नोटीस दिली आणि बोलतांना सांभाळून बोललं पाहिजे असं कोर्टाने सांगितलं आहे. तसेच राणेंना एसपींकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगितलं. पोलिसांत बसून ठेवलं, राणेंची तब्येत खराब झालीय त्यामुळे ते एक दिवस आराम करतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

ठाकरे सरकारवर टीका

ठाकरे सरकारवर टीका करत पाटील म्हणाले की, सत्याचा विजय झाला आणि सरकार सारखे कोर्टाच्या थपडा खात आहे. भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करत नाही. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय. लवकरच जनाशीर्वाद यात्रा निघेल. राणेंना मुंबईत प्रतिसाद मिळाला, मुंबई हरली तर ? मुंबईत पोपटाचा प्राण आहे अशी खोचक टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.

अनिल परब यांच्या विरोधात याचिका दाखल करणार

वाहतुक मंत्री अनिल परब यांनी नारायण राणेंना अटक करण्यासाठी एसपींवर दबाव टाकल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांना पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला तेव्हा फोनवर संवाद साधत असताना त्याचा माईक चालू राहिल्याने त्यांचे फोनवरील संभाषण हे स्पष्ट ऐकु येत हाेते. त्या संभाषणात ते म्हटले की, “हॅलो तुम्ही लोक काय करत आहात? पण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे की नाही?….कोणती ऑर्डर ते लोक मागत आहेत? हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन (अर्ज) नाकारला आहे….मग पोलीस बळाचा वापर करा,” असं अनिल परब फोनवर बोलताना ऐकू येत होतं. त्यामुळे ही सगळी क्लिप राज्याने पाहिली, सगळं ड्राफ्टींग झालंय, लवकरच परब यांच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल असंही पाटील म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT