गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना ऊत आला आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते विरुद्ध भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा नेते सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. तर महाविकास आघाडी सरकार भाजपाच्या नेत्यांचे निलंबन करताना दिसत आहेत. एकमेंकांवर कुरघोड्या करण्याच्या घटनांना राजकीय वर्तुळात उधाणच आल्याचे दिसत आहे.
हे देखील पहा -
अशातच आता महाविकास आघडी सरकारने मोदी सरकार मधील मंत्र्यांवर कारवाई केल्यानंतर केंद्र सरकार आता राज्यातील कोणत्या नेत्यांवर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. छगन भुजबळ यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने कारवाई केली. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावरही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले. त्यामुळे आता कुणाचा नंबर लागणार हीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
२५ वर्षांची भाजपा- शिवसेना युती सरकारमध्ये फुट पडली
शिवसेना भाजपात गेल्या २५ वर्षांपासून युती होती. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणूकांच्या काळात शिवसेनेने भाजपाने आपल्याला फसवल्याचा आरोप करत भाजपापासून विभक्त झाली आणि गेल्या २५ वर्षाच्या युतीला तडा गेला. विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहुमत असूनही शिवसेनेने शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आधीच शिवसेना- राणे वाद असताना निवडणूकांनंतर राज्यात भाजपा -विरुद्ध शिवसेना वाद सुरु झाला. भाजपा नेते महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत,तर महाविकास आघाडी सरकारही भाजपा नेत्यांवर कारवाई करत आहेत. त्यामुळे आता अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, नारायण राणे यांच्यानंतर कोणाचा नंबर लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.