अश्विनी जाधव केदारी
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांचे सगळे आरोप फेटाळले. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर परत जोरदार गंभीर आरोप केले आहेत. यानंतर हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपणानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील काँग्रेसच्या दोन नेत्याचा भष्टाचार उघडकीस आणणार असा खळबळजनक इशारा त्यांनी दिला आहे.
हे देखील पहा-
कायद्याची लढाई ही कायद्यानं लढा;
ते पुढे म्हणाले, कायद्याची लढाई ही कायद्यानं लढा कोल्हापुरी चपललेने नको असा पटलवार पाटील यांनी केला आहे. त्यांनी मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला चांगलच उत्तर दिलं आहे. आज त्यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला आहे.
मुश्रीफ यांना माझे नाव घेतल्याशिवाय शांत झोप लागत नाही;
ते पुढे म्हणाले, मुश्रीफ यांना माझे नाव घेतल्याशिवाय शांत झोप लागत नाही. गोळीशीवाय त्यांना झोप येतेय त्यामुळे एका गोळीचे पैसे वाचवणे माझं कर्तव्य आहे, माझं नाव घ्यायला माझी परवानगी आहे. किरीट सोमय्या हे आरोप करत आहेत तर मग कोल्हापूर जिल्हा बंदची कारवाई कशासाठी ? ईडीची लढाई करताना तोंडाला फेस येईल, त्यामुळे कायद्याची लढाई कायद्याने लढा. येत्या दोन दिवसांत कॉंग्रेसच्या दोन बड्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांना दिला आहे.
ते म्हणाले, हुकूमशाही चाललीय, तुम्ही ed ला उत्तर द्या, 98 कोटी कसे आले? आयकर विभागाची धाड पडली तेव्हा ही तसंच. तर संजय राऊत यांच्याविषयी ते म्हणाले, संजय राऊत मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं, त्यांना कोर्टाकडून फटके खायची सवय लागली आहे.
चिल्लर विषयात शरद पवार पडणार नाहीत;
शरद पवार आपल्या पाठीशी नाहीत हे कदाचित मुश्रीफांना सांगितले असेल त्यामुळे मुश्रीफांची तब्येत बिघडली असेल, चिल्लर विषयात शरद पवार पडणार नाहीत. तसेच पवार हे घोटाळेबाजांना पाठीशी करणार नाहीत असे वाटते. तुम्ही नाटक बंद करा.
या सरकारला पैसे खाण इतकाच माहितीय;
त्यांनी मविआ सरकारबद्दल सांगितलं, या सरकारमध्ये पैसे खाण्याशिवाय काही करत नाही सगळ्या सिस्टीम मोडण्याचं काम चाललंय. तर पैसे खाताना लपवण्याचे कौशल्य यांच्याकडे नाही असे चंद्रकांत पाटील म्हणले.
ज्या मुंबई पोलीस चे नाव सगळीकडे आहे, तरी तुमचे मुंबई पोलीस आयुक्त गायब आहेत . हसन मुश्रीफांना भाजप ची ऑफर नव्हती, ऑफर कोणी नाकारली तरी कोणाला त्रास देण्याची आमची भूमिका नाही.
मास्टर माईंड चंद्रकांत पाटील;
एखादा गिरणी कामगाराच्या घरात जन्माला आलेला माणूस किती प्रसिद्ध होतो, कोणी मला नागालँड चा राज्यपाल ,कोणी तीन पक्ष मला पक्षात घ्यायला तयार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील माणूस त्यांच्याबाबत चर्चा होते. ही लोकशाहीची ताकद आहे.
मुश्रीफांना मित्र म्हणून सल्ला;
आम्ही भुई सपाट कसे झालो ते जाऊद्या, तुम्हाला आता ed ला उत्तरं द्यावी लागणार. यात काही सामान्य माणसं आहेत, त्यातला एक सिनेमा स्टाईल ने गेला पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावे.
तसेच "पश्चिम महाराष्ट्रातून, कोल्हापुरातून आम्ही भुईसपाट झालो, असा आरोप तुम्ही करत आहात. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापुरात भाजपचे फक्त दोन आमदार होते. ते आता आठ झाले आहेत. सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेलं पण स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.