मनसे - भाजप युती होणार? आणखीन एका भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण twitter/@ChDadaPatil
मुंबई/पुणे

मनसे - भाजप युती होणार? आणखीन एका भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. त्याचं कारण म्हणजे आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली आहे. गेल्या २० दिवसांतील ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात या भेटीचे अनेक तर्क - वितर्क लावले जात आहे. (chandrakant patil meets again to raj thackeray at krushnakunj)

हे देखील पहा -

मनसे हा भाजपचा शत्रुपक्ष नाही मात्र मनसेच्या परप्रांतीयांच्या भुमिकेबद्दल आक्षेप असल्याचे चंद्रकात पाटील यांनी काही दिवसांपुर्वी म्हटले होते. तसेच नाशिक महानगरपालिकेत मनसे - भाजप युती होती त्यामुळे ही मनसे - भाजप युती नाशिककरांसाठी काही नवीन नाही असंही ते म्हणाले होते. शिवाय राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानासुद्धा या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. मात्र ही वैयक्तिक भेट होती असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

आजच्या भेटीतबी युतीबाबत चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज ठाकरे यांनीच मला निमंत्रण दिलं होतं असही ते म्हणाले. तसेच परप्रांतीयांच्या भुमिकेबद्दल राज ठाकरेंच मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT