Chandrakant Patil Exclusive Interview साम टिव्ही
मुंबई/पुणे

Chandrakant Patil Exclusive: शाईफेक हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटलांची सविस्तर मुलाखत; पवार-ठाकरेंना घराणेशाही हवी असल्याचा गंभीर आरोप

Chandrakant Patil Exclusive Interview: यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

शितल पवार, पुणे

Chandrakant Patil Exclusive Interview: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल, १० डिसेंबरला पुण्यात शाईफेक करण्यात आली. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. याच रागातून आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी हा शाई हल्ला केला. यानंतर राज्याचं राजकारण तापलं आणि अनेक प्रतिक्रिया आल्या. याबाबत आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच आपली बाजू सविस्तरपणे माडंली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. (Chandrakant Patil Latest News)

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  म्हणाले की, भ्याड हल्ला करण्यात आला, संपूर्ण महाराष्ट्र आवाक् झालाय. काल, शनिवारी देवगिरी जिल्ह्यात पैठणला जिथं संत एकनाथांनी अध्यात्माचं चिंतन केलं, लिखाण केलं ते संतपीठ सरकारने बनवलं. त्या संतपीठाचा पहिला सर्टिफिकीट कोर्स पूर्ण झाला. २०० जणांना काल सर्टिफिकीट मिळण्याचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यात त्यांना १२ कोटी आतापर्यंत दिले. त्यांनी आणखी २३ कोटींची मागणी केली, आणखीही देऊ. ती देण्याची घोषणा करताना मी म्हणालो की, अशा प्रकारचे कोर्सेस गावोगावी सुरू झाले पाहिजे.

तुम्हीपण चार पैसे लोकांकडे मागायला पाहिजे. मग मी म्हणालो महाराष्ट्रात शाळा कुणी सुरू केल्या? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, त्यात त्यांचा काय अनादर झाला? महाराष्ट्रात शाळा आंबेडकरांनी सुरू केल्या, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केल्या, महर्षी धोंडो कर्वेंनी केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी केल्या. त्यांनी सरकारी अनुदानासाठी थांबले नाही. भीक मागून आपल्या संस्था चालवल्या. (Latest Marathi News)

याचा अर्थ काय होतो? स्तुती होतो की निंदा होते की अनादर होतो? तरीसुद्धा यावरची कॉन्ट्रोव्हर्सी थांबवण्यासाठी मी तीनवेळेला टीव्हीच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. तर तिसऱ्या स्पष्टीकरणाला मी दिलगिरीही व्यक्त केली, की मी काही चुकीचं बोललो नाही ही माझी ग्रामीण पद्धत आहे. तरी तुम्हाला असं वाटंत असेल की यातून भावना दुखावल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तरीही इथे आज शाईफेकीचा कार्यक्रम झाला, हा लोकशाहीला धोका आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल श्रद्धा व्यक्त करायची, त्यांनी लिहीलेली घटनाच तोडायची? घटनेमध्ये प्रत्येक गोष्ट कायद्यानेच होईल असं सांगण्यात आलं आहे. (Maharashtra News)

तुम्ही माझ्यावर केस दाखल करा ना, की यांनी बाबासाहेबांचा आदर केला आहे. एका फार मोठ्या घटानाज्ज्ञाने मला सांगितलं की, Bagging म्हणजे भीक हा एक जागतिक शब्द आहे. न्यायालयातही आपण न्यायाची भीक मागतो. आई-वडील मुलाला म्हणतात की मी तुला भीक मागून शिकवलं. यातला भावार्थ समजून न घेता मग वर्गणी म्हणायला काय झालं होतं? आम्ही ग्रामीण ना... ग्रामीण गिरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचं नेतृत्व करतो हे पोटातलं दुखणं आहे. अजित पवार, सुप्रिया ताई हे तुमच्या पोटातलं दुखणं आहे.

दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सुद्धा शाईफेक होते. कुठल्या थराला जातंय राजकारण? तुमच्यावर शाईफेक झाली तर असंच बोलणार का? राष्ट्रवादी मला वारंवार टार्गेट करते. पवार घराणं, ठाकरे घराणं मला टार्गेट करते. संजय राऊत, आदित्य ठाकरे, नव्याने आलेल्या सुषमा अंधारे मला टार्गेट करतात. यांना महाराष्ट्रात घराणेशाही आणायची आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे आम्ही सामान्य घरातले मुलं मंत्री झाले यांना बघवत नाही. १९९५ पासून बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे सामान्य माणूस आमदार-मंत्री व्हायला लागला आम्हाला त्यांचा अभिमान आहे, पण त्यांच्या मुलगा आज काय करतोय?

शाही फेकण्यापलिकडे करण्यासारखं काही शिल्लक नाही. मी कुणालाही घाबरणार नाही, मी चळवळीतून आलेलो आहे. उद्यापासून ते काय करणार? शर्ट फाडणार का? माझ्या बॅगेत २०-३० शर्ट्स असतात, लगेच बदलतो आणि नवीन शर्ट घालतो. मी कुणालाही घाबरणार नाही. शाई टाकणं म्हणजे भस्मासूर आहे.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही कुणाची प्रॉपर्टी आहे? तुम्हाला काय माहित माझा इतिहास? नामांतराच्या लढ्यात मी होतो. तीनवेळेला ठराव झाले, तेव्हा दंगली व्हायच्या. तेव्हा आम्ही गावोगावी संवाद यात्रा काढल्या, की का विरोध आहे तुमचा बाबासाहेबांच्या नावाला? आम्ही भरपूर दगडं खाल्ली.

काल, माझा बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या आवारात सत्कार झाला. त्यांनी माझ्याहस्ते आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्याचा आग्रह केला, मला आंबेडकरांचा अप्रतिम पुतळा भेट म्हणून दिला. तुम्ही कुठे होता? रोहित पवार, संजय राऊत, सुषमा अंधारे तेव्हा कुठे होता? रोहित पवारांनी आंबेडकर वाचले आहेत? रोहित पवार माझ्या समोर येऊन बसा. रोहित पवार यांनी गेले २ ते ३ दिवस वातावरण बिगडवलं.

यावेळी त्यांनी एका पत्रकारावरही आरोप केला आहे. बरोबर शाही फेकतानाच कसा अॅंगल मिळाला? त्या पत्रकारावर कारवाई झाली नाही तर मी आंदोलनाला बसेल. हा काही पत्रकारितेला शोभणार विषय नाही. ही वृत्ती मोडून काढावी लागेल. मी अपील केलंय की कुणी काही करायचं नाही. उद्या पंतप्रधान मोदी राज्यात आहे म्हणून हे सगळं चाललंय असं पाटील म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nevasa Exit Poll: मानखुर्द मतदारसंघात कोण विजयी होणार? संभाव्य आमदाराचं नाव आलं समोर

Exit Poll Maharashtra : राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणेंची जादू पुन्हा चालणार का? एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll: श्रीवर्धनचा गड आदिती तटकरे राखणार? VIDEO

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT