PM Modi Nagpur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर (Nagpur) दौऱ्यावर आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. सकाळी 9.30 वाजता नागपुरात आल्यावर पंतप्रधान मोदी नागपूर रेल्वे स्थानकावर जाऊन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवतील.
नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. झिरो माईल स्टेशन ते खापरी पर्यंत ते मेट्रोने प्रवास करणार आहेत. यानिमित्ताने मेट्री स्टेशन सजवण्यात आले आहे. मेट्रो स्टेशन बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आणि नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
असा असेल संपूर्ण दौरा
पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
सकाळी 10 वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करतील.येथे ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -II’ ची पायाभरणीही करतील.
सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत.
सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूरचे राष्ट्रार्पण होणार आहे.
सकाळी 11:30 वाजता 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था , चंद्रपूर’ राष्ट्रार्पण आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्रचे लोकार्पण. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.