Crime News : बँकेची 1 कोटी 29 लाखांची फसवणूक; गोरेगाव पोलिसांकडून एकास अटक

या फसवणूक प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एक व्यक्तीस अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु
Goregaon Police Station
Goregaon Police StationSaam Tv
Published On

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबई उपनगरातील गोरेगाव पश्चिमेकडील एका सरकारी बँकेतील एक कोटी 29 लाख रुपये बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्तीच्या खात्यात वळवले व ते पैसे विविध खात्यांमध्ये वळवून काढून घेतले. या फसवणूक प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी (Goregaon Police) एक व्यक्तीस अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत परवेज शहा असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Goregaon Police Station
Petrol Diesel : पेट्रोल-डिझलच्या दरात बदल; जाणून घ्या स्वस्त इंधनाचे दर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 मध्ये गोरेगाव मधील एका सरकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी सायबर सेलकडे एक तक्रार झाला होता या अर्जावरून गोरेगाव पोलिसांनी तपासास सुरुवात केली. बँकेत अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रांचा वापर करून एक खाते उघडले. ओव्हर ड्राफ्ट खात्यातून मोबाईल बँकिंगचा वापर करून 1 कोटी 29 लाख रुपये काढले गेले. ही सर्व रक्कम चांदिवली, मरोळ, पवई येथील खासगी बँकेच्या खात्यात जमा झाल्याने संशय बळावला.यामुळे बँकेने त्या खात्याची माहिती मागवली.यानंतर सोन बँकांनी माहिती देण्यास नकार दिल्याने ज्या खात्यात रक्कम जमा केली होती ती खाती फ्रिज केली.

यानंतर बँकेकडे एक केवायसीसाठी जून महिन्यात अर्ज आला होता. बँकेने त्या खातेधारकाला इंटरनेट बँकिंगची सुविधा दिली होती. केवायसी अपडेट झाल्यावर त्या खात्यातून 91 लाख रुपये काढून विविध खात्यांत टाकले गेले. तसेच बँकेचे ॲप्स वापरून 38 लाख रुपयेदेखील दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बँकेने चौकशी केली. त्या संशयित खातेधारकाचा 2014 मध्ये मृत्यू झाल्याचे उघड झाले.

Goregaon Police Station
Ajit Pawar : 'कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही; चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीचा अजित पवारांनी केला निषेध

यानंतर बँकेने चौकशी सुरू केली. बँक प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. फसवणूकप्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या मार्फत पुन्हा गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलीस पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात जमा झाले, त्याची माहिती पोलिसांनी काढली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परवेझला कुर्ला येथून ताब्यात घेऊन अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com