Chandni Chowk Bridge Demolition Saam TV
मुंबई/पुणे

Chandni Chowk Bridge Demolition: चांदणी चौक पूल ब्लास्ट केल्यानंतर उर्वरीत पूल हा जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आला

Pune Latest News: सदर पूल एक व दोन ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Video: चांदणी चौक पूल ब्लास्ट केल्यानंतर उर्वरीत पूल हा जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आला.

उत्कर्ष मेहता EDFC कंपनी पार्टनर

- आम्ही पूल पाडण्यात यशस्वी झालो आहोत

- दोन टप्प्यात पूल पाडण्यात आला

- पहिला ब्लास्ट करून पूल कमजोर केला आणि दुसरा जेसीबी आणि इतर मशीन सहाय्याने पूल पाडण्यात आला

- सकाळी ८ वाजेपर्यंत सगळं काम पुर्ण होईल

- आम्ही आधीदेखील पुर्ण ब्रीज पडेल असं सांगितलं नव्हतं

- आपल्याला पुल फक्त पार्टमध्ये करायचा होता, जेणेकरून आपल्याला ते पुर्णपणे पाडण्यासाठी मदत होईल.

अखेर चांदणी चौक पूल पुर्णपणे जमीनदोस्त

पुण्यातील चांदणी चौक पुल पाडतानाचे काऊंट डाऊन

१२.४५ मिनिटांनी पोलीस प्रशासनाने पुलाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर निर्मनुष्य केला

१२.५० वाजता पोलिसांकडून पुन्हा एकदा अलर्ट

१२.५५ अधिकाऱ्यांकडून शेवटची पाहणी

०१.००वाजता ब्लास्ट करण्यात आला

ब्लास्ट झाल्यानंतर पूल फक्त 50 टक्के कोसळला

मात्र त्यानंतर जवळपास दहा जेसीबीच्या बाकी पूल पाडण्यात आला

चांदणी चौक पूल पाडल्यानंतर ब्लास्टमास्टर आनंद शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा Video

चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी या स्फोटाचे मुख्य इंजिनिअर आनंद शर्मा यांनी माहीती दिली की, जिथे जिथे आम्ही स्फोटके लावली होती, त्या ठिकाणांहून पूलाचे स्ट्रक्चर जमीनदोस्त झाले आहे. यामधील स्टीलचे रॉड आहेत ते खाली आहेत. पूलाच्या मधला जो एक खांबाचा देखील स्फोट झाला असून तो अद्याप खाली आलेला नाही. पण जेव्हा या खांबाचं कॉंक्रीट दूर केलं जाईल तेव्हा तो पूर्णपणे खाली कोसळेल. या पूलामध्ये स्टील जास्त असल्यानं तो दोन्ही बाजूनं दगडांवर ठेवण्यात आल्यानं पूलाचा भाग पूर्णपणे पडलेला नाही. पण जसा स्फोटं होणं अपेक्षित होतं तसा स्फोट झालेला आहे असं शर्मा म्हणाले आहेत.

चांदणी चौकातील पूल पुर्णपणे का पडला नाही? मोठं कारण आलं समोर

सामटीव्हीने याबाबत या पूलाच्या पाडकामात असलेल्या काही मजूरांबाबत बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल, शनिवारी जे ड्रिल घेण्यात आले होते त्यात कालच्या पावसामुळे खूप पाणी गेलं होतं. त्यामुळे ब्लास्ट कमी प्रमाणात झाला आहे. याबाबत अद्यापतरी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र नोएडाचा प्रयोग पुण्यात फसला आहे का अशी कुजबज सुरू झाली आहे. दरम्यान या ब्लास्टाबाबत आणि एकूणच पूलाच्या स्थितीबाबत अभ्यास केला जात आहे.

चांदणी चौकातील पूल पडला! पाहा लाईव्ह

चांदणी चौकातील पूल पुढच्या 5 मिनिटांत होणार जमीनदोस्त

अशाप्रकारे पाडणार चांदणी चौकातील पूल

सदर पूल एक व दोन ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सदर पूल पाडण्यासाठी दुपारी ४ वाजल्यापासून १४४ कलम लागू करण्यात येणार आहे, अशी महत्वाची माहिती पुणे (Pune) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. सर्व बाबी व्यवस्थित असेल तर पूल आधीच स्फोटकाद्वारे पाडण्यात येईल.

चांदणी चौकातील पुल पाडण्याची तयारी पूर्ण! पोलिसांशी खास बातचीत

चांदणी चौकातील पुल पाडण्याची तयारी पूर्ण! आनंद शर्मांसोबत खास बातचीत

रात्री 1 च्या सुमारास चांदणी चौक पूल जमीनदोस्त करणार

रात्री 1 च्या सुमारास चांदणी चौक पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ब्लास्टनंतर होणाऱ्या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुलाला पूर्णपणे पांढऱ्या कापडाने झाकण्यात आलं आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील उडान पूल अवघ्या काही मिनिटानंतर स्फोटकांचा वापर करून पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी तसेच साताऱ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे वळविण्यात आली आहे.

Pune Chandani Chowk Live: 1 बटन, 6 सेकंद आणि पूल भुईसपाट होणार

Chandni Chowk Bridge Demolition: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हा सदर पूल एक व दोन ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल (Bridge) पाडण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सदर पूल पाडण्यासाठी दुपारी ४ वाजल्यापासून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. हा पूल पाडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीचा वापर होणार आहे. त्यामुळे ट्विन टॉवर प्रमाणे हा पूल देखील काही सेकंदात जमिनदोस्त होणार आहे. मागील काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही ताफा चांदणी चौकातील वाहतूक कोंडीमध्ये अडकला होता. रोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांना या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एक निवदेन देण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून चांदणी चौक परिसराची पाहणी करण्यात आली आणि हा पूल तोडण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता चांदणी चौकातील पूल ब्लास्ट करुन पाडण्यात येणार आहे. (Pune Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यातल्या नवले ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT