CHAKAN MIDC POTHOLES THREATEN INDUSTRIES; 4000 WORKERS AT RISK saam tv
मुंबई/पुणे

खड्ड्यांमुळे चाकणमधील उद्योग जाणार, 4 हजार कुटुंब रस्त्यावर येणार

Chakan MIDC in Trouble: राज्यातले खड्डे जीवावर उठल्याचं तुम्ही पाहिलंय... मात्र आता हे खड्डे थेट नोकऱ्यांवर उठले आहेत. तब्बल चार हजार कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त केली जातेय. नेमकं कशामुळे हे घडलंय? याला कोण जबाबदार आहे? पाहूयात हा रिपोर्ट.,..

Girish Nikam

पुण्याच्या चाकण औद्योगिक परिसरातले जीवघेणे खड्डे, वाहतूक कोंडी, आणि अपुऱ्या सुविधांमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत... त्यामुळे सुमारे 20 लघुउद्योजक स्थलांतराच्या तयारीत आहेत. या कंपन्या गेल्यास सुमारे एक हजार कोटींच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे. त्यासोबतच 4 हजार कामगारांची कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, २० कंपन्यांचे मालक आणि ट्रॅफिक फ्री चाकण अॅक्शन कमिटीच्या सदस्यांनी उघडपणे आपली व्यथा मांडली.

उद्योजकांनी सरकारकडे काय मागण्या केल्या आहेत. ते पाहूया..

खड्ड्यांमुळे चाकणमधील उद्योग जाणार

खड्डे आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी

सरकारी विभागांमध्ये जबाबदारी ढकलण्याचे प्रकार

3 ट्रक टर्मिनल उभारावेत

CCTV बसवण्यात यावेत

पथदिवे बसवण्याची गरज

वीज, पाणी वेळेवर पुरवण्यात यावं

एखादी नोडल एजन्सी निवडून तत्काळ उपाययोजना कराव्यात

आता याच खड्ड्यांच्या मुद्यांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे...अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी स्थानिक आमदारांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलंय...तर ठाकरेसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी विभागांच्या अनास्थेमुळे कामांना विलंब होत असल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चाकण MIDCचा विषय गांभीर्याने घेतल्याचं सांगितलंय.

चाकण एमआयडीसी परिसरातल्या रस्त्यांची जबाबदारी अनेक खात्यांना जोडलेली आहे. त्यामुळे जबाबदारी ढकलण्याचे प्रकारांना सामोरं जावं लागलं. गेल्या दोन वर्षांत उद्योजकांनी थेट मुख्यमंत्र्यांशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी उद्योजकांची तक्रार आहे. आता स्थलांतरांच्या इशाऱ्यानंतर तरी सरकार दरबारी चक्रे फिरणार का ?हाच खऱा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

SCROLL FOR NEXT