दिव्यात रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांतर्फे साखळी उपोषणाला सुरवात प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

दिव्यात रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांतर्फे साखळी उपोषणाला सुरवात

दिवा-शीळ रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांनी साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांच्या कार्यालयासमोर या साखळी उपोषणाला सुरवात केली आहे.

प्रदीप भणगे

दिवा : दिवा-शीळ रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांनी साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांच्या ऑफिससमोर या साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. सदर उपोषणात भाजप कार्यकर्ते सुद्धा सामील झाले आहेत. तर स्थानिक रहिवासी आणि भूमीपुत्र पांडुरंग भोईर यांनी दिवा-शिळ या ४५ मीटर रस्त्याचे नव्याने सर्वे करा अशी मागणी स्थानिक आमदारांकडे केली आहे. (Chain fast begins by victims in road widening in Diva)

हे देखील पहा -

दिवा-शीळ रस्त्यावर दिवा स्टेशन ते दिवा जंक्शन सर्कल ह्या रस्त्यावर ठाणे महानगरपालिकेतर्फे रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सदर रस्ता रुंदीकरणात साधारण २२ इमारती बाधित होत असून या इमारतींमधील जवळजवळ ३२० पेक्षा जास्त कुटुंब बाधित होत आहेत. रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांना महापालिकेतर्फे विचारात न घेता जोरजबरदस्ती आणि दडपशाही पद्धतीने खोली व गाळे खाली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वास्तविक दिवा स्टेशन ते दिवा सर्कल हा रस्ता खूपच रुंद आहे. जर या रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग व बेकायदेशीरपणे रस्ता अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्ता मोकळा केल्यास येथे रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता लागणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच सदर रस्त्यावर असणारे अनधिकृत रिक्षा स्टँड हटवल्यास मोठा आणि प्रशस्त रस्ता येथे उपलब्ध होणार आहे. तर रस्ता बाधित रहिवासी संघटना, दिवा यांनी 10 विविध मागण्याचे पत्र त्यांनी पालिकेला दिले आहे. सदर आंदोलनात स्थानिक रहिवासी, महिला वर्ग आणि तसेच भाजप पदाधिकारी आदेश भगत, सचिन भोईर, निलेश पाटील, रोहिदास मुंडे, विजय भोईर उपस्थित होते.

तर स्थानिक रहिवासी आणि भूमीपुत्र पांडुरंग भोईर यांनी दिवा-शिळ या ४५ मीटर रस्त्याचे नव्याने सर्वे करा अशी मागणी स्थानिक आमदारांकडे केली आहे. पांडुरंग भोईर यांनी याबाबत सांगितले की, माझी दिवा स्टेशन जवळ वडिलोपार्जित शेतजमीन आहे. सदर जमिनीमधून P.W.D विभागाचा १९८८ रोजी २४ मीटरचा रस्ता भूसंपादन करण्यात आला होता. त्यामध्ये माझी ७,१.५, २ गुठे या प्रमाणात जमीन बाधित झाली आहे. पण यासाठी शासनाने माझी अधिक ५ गुंठे जमीन जबरदस्तीने संपादन करून घेतली आहे.

ठाणे महानगरपालिकेकडून आता ४५ मीटर डीपी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यात आमच्या काही इमारती बाधित ठरविल्या जात आहेत. परंतु ठाणे महानगरपालिकेने केलेला सर्वे हा चुकीच्या पद्धतीचा आहे असे आमचे ठाम मत आहे. किंबहुना मला २४ मीटर रस्त्यात बाधित झालेल्या जमिनीचा मोबदलाच अजुन मिळाला नाही तर मी ४५ मीटरचा रस्ता रुंदीकरणात बाधित कसा होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT