Automatic Door for Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local News : ऑटोमॅटिक दरवाजांच्या लोकलची यशस्वी चाचणी, 'या' महिन्यात येणार मुंबईकरांच्या सेवेत, रेल्वे मंत्रालयानं दिली महत्त्वाची अपडेट

Automatic Door for Local Train: मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! कुर्ला कारशेडमध्ये स्वयंचलित दरवाजांची चाचणी यशस्वी पार पडली. डिसेंबरअखेर विना वातानुकुलित लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.

Alisha Khedekar

  • कुर्ला कारशेडमध्ये विना वातानुकुलित लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे.

  • विना वातानुकुलित लोकलचे दरवाजे १० सेकंदांत उघड-बंध होणार असून अलार्मचीही व्यवस्था यात करण्यात आली आहे.

  • हवा खेळती राहावी यासाठी जाळी, झडपा व काचेचा वापर करण्यात आला आहे.

  • डिसेंबरअखेर मुंबईकरांना या लोकल प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. विना वातानुकूलित लोकलच्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कुर्ला कारशेडमध्ये काल पार पाडली. मात्र दरवाजे बंद असताना लोकलच्या डब्यातील हवा खेळती राहावी यासाठी जाळी, झडप यांचा वापर करण्यात आला आहे. डिसेंबरअखेर पर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांची विना वातानुकूलित लोकल मार्गस्थ करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

मुंब्रा स्टेशन परिसरात लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर आठ प्रवासी जखमी झाले होते. लोकलच्या दरवाजात लटकत प्रवास करताना हा प्रकार घडला. या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या लोकल वातानुकूलित आणि सध्या सेवेत असलेल्या विना वातानुकुलित लोकलला स्वयंचलित दरवाजे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार प्रायोगिक तत्त्वावर एका लोकलच्या महिला डब्यात स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या चाचणीच्या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना उपस्थित होते.

विना वातानुकुलित लोकलचे दरवाजे बंद झाल्यावर हवा खेळती राहण्यासाठी दरवाजाच्या खालील भागात जाळी लावण्यात आली आहे. त्याच्या वरील बाजूस काचेचा वापर करण्यात आला आहे. दरवाजाच्या मध्यभागी झडपा असून पावसाळ्यात पाणी आत येऊ नये यासाठी त्या बसवण्यात आल्या आहेत.

या लोकलचे दरवाजे १० सेकंदांत उघड - बंद होणार आहेत. हालचाल होताना अलार्मची व्यवस्था या विना वातानुकुलित ट्रेनच्या दरवाजासाठीही करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान रेल्वेच्या या निर्णयाने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

Thane To Buldhana Travel: ठाण्यावरुन बुलढाण्याला प्रवास कसा करायचा? रेल्वे, खाजगी बस आणि टॅक्सी जाणून घ्या सर्व मार्ग

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

SCROLL FOR NEXT