CENTRAL RAILWAY PLANS 26 KM EMERGENCY ROAD ALONG KARJAT LONAVALA GHAT TO BOOST PASSENGER SAFETY Saam tv
मुंबई/पुणे

Karjat - Lonavala : कर्जत -लोणावळा घाटात २६ किलोमीटरचा नवा रस्ता, 'या' कारणामुळं मध्य रेल्वेनं घेतला निर्णय

Karjat - Lonavala Central Railway : मुसळधार पावसामुळे कर्जत-लोणावळा घाटात होणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांनंतर मध्य रेल्वेने रेल्वे मार्गालगत २६ किलोमीटर लांबीचा आपत्कालीन रस्ता उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

Alisha Khedekar

  • मध्य रेल्वेने कर्जत-लोणावळा घाट विभागात २६ किमी आपत्कालीन रस्ता उभारण्याचा प्रस्ताव

  • रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि मदत पथकांना रेल्वे रुळांपर्यंत थेट पोहोचणे शक्य होणार आहे

  • अन्न, पाणी, औषधे आणि अन्य मदत साहित्य घटनास्थळी जलद पोहोचवता येणार

  • मध्य रेल्वेने नुकसानग्रस्त रेल्वे लाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवले

गेल्या वर्षीच्या तुलनेने राज्यात यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पावसाने जोर धरला आणि सगळीकडे हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं, तर काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गावर परिणाम झाला. कर्जत - लोणावळा घाट परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळली. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये तसेच प्रवासी अडकू नयेत यासाठी मध्य रेल्वेने कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गालगत सुमारे २६ किलोमीटर लांबीचा आपत्कालीन रस्ता उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

या रस्त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच मदत पथकांना थेट रेल्वे रुळांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवणे शक्य होईल. तसेच पिण्याचे पाणी, अन्न, औषधे आणि इतर आवश्यक मदत साहित्यही घटनास्थळी लवकर पोहोचवता येईल. याच पार्श्वभूमीवर आपत्कालीन रस्ता उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने नुकसानग्रस्त मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहिली रेल्वे लाईन अवघ्या ४८ तासांत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर १५ जुलै रोजी दुसरी लाईनही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तिसऱ्या लाईनवरील दुरुस्तीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून ते वेगाने सुरू आहे

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उर्वरित लाईन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आणि भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीला अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी हा २६ किलोमीटरचा आपत्कालीन रस्ता महत्त्वाचा ठरणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदूरबार- भटक्या-विमुक्त जातींच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Kitchen Hacks : फ्रिजमधून घाण वास येतोय ? तर चहापत्तीचा 'हा' भन्नाट उपाय करून पाहा

मोठी बातमी: NEET पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आक्रमक! केंद्र अन् NTA वर ताशेरे; कोर्टात नेमकं काय घडलं?

Crime: मित्रासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार, जंगलात फिरण्यासाठी गेले असता भयंकर घडलं

Mumbai Police : दादरमध्ये संतापजनक घटना! आंदोलक विद्यार्थिनीला पोलिसाकडून चुकीचा स्पर्श? व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ

SCROLL FOR NEXT