Mumbai Local Train : Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : कर्जत आणि कसाऱ्यातील प्रवाशांना मोठा दिलासा; प्रवास होणार सुसाट, लवकरच १५ डब्यांची लोकल

Mumbai Local Train update : कर्जत आणि कसाऱ्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवास सुसाट होणार आहे. कर्जत आणि कसारा मार्गावर लवकरच १५ डब्यांची लोकल धावणार आहे.

Vishal Gangurde

मुंबई : कर्जत आणि कसाऱ्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून ठाण्याच्या पुढील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वे कसारा आणि कर्जत मार्गावरील लोकल सेवेची क्षमता २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार करत आहे. तसेच १२ डब्याचे लोकल ट्रेनचे रुपांतर १५ डबे करण्याच्या तयारीत आहे. यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम जलद गतीने सुरु आहे. कल्याणच्या पुढे १५ डब्यांची लोकल धावणार असल्याने कर्जत आणि कसारा येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, ठाणे ते कर्जत आणि कसारा मार्गावर लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी प्रवासी संघटनांची दोन दिवसांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. या बैठकीनंतर आता रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्याची तयारी सुरु केली आहे.

मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकल सेवेची क्षमता वाढवण्यासाठी तीन प्रमुख कामे हाती घेतले आहेत. मध्य रेल्वेवरील रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम सुरु आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान लोकलच्या पार्किंगसाठी काम सुरु आहे. तसेच सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर १५ डब्याच्या लोकलसाठी ५ ते ६ प्लॅटफॉर्मची दुरुस्ती सुरु आहे. १५ डब्याच्या लोकलसाठी दोन प्लॅटफॉर्मचा विस्तार करावा लागणार असून त्यासाठी जुनी रचना पाडली जाणार आहे.

एमयूटीपी अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या कल्याण ते बदलापूर, कल्याण ते आसनगाव हे दोन रेल्वे मार्ग जोडण्यासाठी सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी या ट्रॅकवरील सिग्नलचे खांब आणि पॉइंट्स हलवणे आवश्यक असल्याचे सांगितलं जात आहे.

आता ठाणे ते कल्याण दरम्यान विना अडथळा १५ डब्यांची लोकल ट्रेन चालवण्यासाठी प्लॅटफॉर्म दुरुस्तीचं काम सुरु आहे. प्लॅटफॉर्मच्या लांबीची दुरुस्ती केल्यास मोठा अडथळा दूर होणार आहे. १५ डब्यांच्या लोकल सेवेच्या पार्किंगसाठी कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते आसनगावदरम्यान जागा उपलब्ध होऊ शकते.

रेल्वे संघटनेची मागणी काय?

'आमची मागणी आहे की, 'रेल्वेने ठाणे ते कर्जत आणि कसाऱ्यादरम्यान गर्दीच्या वेळात २० लोकल सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. यामुळे मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी रेल्वे संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT