Central Railway Service Saam tv
मुंबई/पुणे

Central Railway Service: इतक्या मुसळधार पावसातही रेल्वेसेवा कुठेही विस्कळीत झाली नाही; मध्य रेल्वे प्रशासनानं सांगितली नेमकी कारणं

Central Railway Service: मुसळधार पावसात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेसेवा का विस्कळीत झाली नाही, या मागचं कारण सांगितलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Central Railway News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, या मुसळधार पावसातही रेल्वेसेवा कुठेही विस्कळीत झाली नाही. यावरून प्रवाशांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. यावर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेसेवा का विस्कळीत झाली नाही, या मागचं कारण सांगितलं आहे. (Latest Marathi News)

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेल्वेसेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. भूस्खलन, जमीन खचणे यांसारख्या घटना टाळण्यासाठी रेल्वे लक्ष ठेवून आहे. २०१९ मध्ये भूस्खलनामुळे रेल्वे ट्रॅक, बोगदे आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे मोठं नुकसान झालं होतं. भूस्खलनामुळे १४ दिवस दोन्ही रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला होता. त्यामुळे यंदा रेल्वेने रेल्वेसेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली आहे.

गेल्या आठवड्यात पुणे-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील रायगडमधील आडोशीजवळ दरडी कोसळण्याच्या घटना घडली होती. मात्र, या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नव्हता. मात्र, मुसळधार पावसामुळे अधिकारी या भागात लक्ष ठेवून आहेत.

रेल्वे अधिकारी पुढे म्हणाले, 'रेल्वेसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी नाल्यातील गाळ काढणे, झाडे छाटणे आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय आधीच करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने मुंबई विभागातील २४ असुरक्षित ठिकाणे आणि पुणे विभागातील २५ असुरक्षित ठिकाणे अधोरेखित केली आहेत'.

'सीपीआरओ'चे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, घाट विभागातील रेल्वेसेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. घाट विभागातील अतिसंवेदनशील भागात विशेष योजना केली आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीद्वारे या भागाची २४ तास देखरेख सुरू आहे. या माध्यमातून नियंत्रण कक्षाला सतत अपडेट दिले जात आहेत'.

पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'रेल्वे मार्गावरील २५ असुरक्षित ट्रॅक आणि पूल यांची नोंद केली असून त्याचं निरीक्षण सातत्याने केले जात आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भारताला तर पाकिस्तानही हरवेल...' टीम इंडियावर Wasim Akram ची जहरी टीका

Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

Homemade Snacks Quick Recipe: पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्याला 'या' युनिक रेसिपी नक्की ट्राय करा

UP Madrasa Act : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UP मदरसा अ‍ॅक्टला मान्यता, 17 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

HBD Virat Kohli: महागड्या गाड्या, अलिशान घर; दिवसाला कमावतो 5 कोटी! विराटची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT