Central Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Central Railway : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक तडकाफडकी रद्द, नेमकं कारण काय?

Rohini Gudaghe

विकास काटे, साम टीव्ही प्रतिनिधी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटेपासुन पडणाऱ्या पावसामुळे काही काळ रद्द करण्यात आली होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. आज पडणाऱ्या पावसामुळे रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेला ठाणे ते दिवा येथील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द

पावसामुळे मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द आल्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला (Mumbai Local News) आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. याचा फटका मध्य रेल्वेला देखील बसत आहे. परंत मेगाब्लॉक रद्द केल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेकांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झालाय.

मध्य रेल्वेची वाहतूक

जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या, पाणी साचल्याच्या घटना समोर येत (Thane To Diva Mega block) आहे. तर रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू होती. त्यातच ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे आसनगाव ते कसारा या मार्गावरील वाहतूक देखील सकाळी पूर्णत: ठप्प झाली होती. त्यामुळे लोकसेवा बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पावसाचा वाहतूकीवर परिणाम

पनवेल परिसरात देखील सकाळ पासून मुसळधार पाऊस (Central Railway Mega Block) आहे. तर कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. कळंबोलीत रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. रस्त्यावर पाणी साचल्याने गाड्या अडकल्या आहेत. कार , परिवहन बस बंद पडल्या. आता पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास सुरुवात (Central Railway) झालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT