प्रमोद जगताप, साम टीव्ही मुंबई
मुंबईकरांसाठी आज पुन्हा एक चिंताजनक बातमी आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची कसोटी लागलेली आहे. कारण मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा आज सलग दुसरा दिवस आहे. या ब्लॉकमुळे तब्बल ५३४ लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसमोर प्रवासाचं मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची कसोटी लागलेली आहे.
सीएमएसटी येथे फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम आज देखील सुरु आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील सर्व लोकल भायखळ्यापर्यंतच चालवल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सीएसएमटी येथील ब्लॉकमुळे (Central Railway Megablock) लोकल हार्बर मार्गावर वडाळ्यापर्यंत, तर मुख्य मार्गावर भायखळ्यापर्यंत चालवण्यात येणार आहेत. आज अनेक रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ब्लॉकमुळे घरी राहणंच पसंत केलं आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकावर शुकशुकाट दिसून येत आहे.
मुंबईकरांनी महत्त्वाच्या कामाशिवाय लोकलने प्रवास करू नये, असं आवाहन मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करण्यात आलं (Megablock Updates) आहे. या ब्लॉकमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं दृश्य आहे. तर अनेक नोकदारांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे आज लोकल गाड्या चालणार असल्याची माहिती मिळतेय. या मेगाब्लॉकचा लोकलला मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं चित्र आहे.
मध्ये रेल्वेचे गजबजलेले स्थानक म्हणून बदलापूर स्थानकाची ओळख आहे. मेगाब्लॉकमुळे आज स्थानक खाली दिसत आहे. सकाळच्या सुमारास येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईच्या दिशेने कामाला येत (Mumbai Local News) असतात. मात्र, मेगाब्लॉकमुळे इथल्या प्रवाशांनी देखील घरी राहणे पसंत केले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर शुकशुकाट दिसून येत आहे. या ब्लॉकमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचं चित्र (Mumbai News) आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.