मध्य रेल्वे मार्गावर (Central Mega Block) जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर तब्बल ९९ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक तर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये ९३० लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांची असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि खासगी ऑफिसला केली आहे.
सीएसएमटी स्थानकात २४ डब्यांचा रेल्वे गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० -११ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम पूर्ण करण्यासाठी आधीच ३६ तासांचा मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली होती. त्याच बरोबर बुधवारी ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदी करणासाठी ६३ तासांच्या मेगाब्लॉकची मध्य रेल्वेने घोषणा केली आहे. या विशेष ब्लॉक दरम्यान प्लॅटफॉर्मच रुंदीकरण तसेच फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे. या दोन्ही मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील ९५६ लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
ठाणे रेल्वे स्थानकावर डाऊन फास्ट मार्गावर ६३ तासांचा विशेष मेगाब्लॉक असेल. ३०/३१ मेच्या मध्यरात्री १२.३० पासून २ जून दुपारी ३.३० पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील ३६ तासांचा ब्लॉक ३१/१ मेच्या मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होणार आहे. जो २ जुन दुपारी १२.३० वाजेपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान ९३० लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
मेगाब्लॉक कालावधीमध्ये म्हणजे, शुक्रवारी १६१ लोकलसेवा, शनिवारी ५३४ लोकलसेवा आणि रविवारी २३५ लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर ४४४ लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार तर ४४६ गाड्या शॉर्ट ओरिजिनेट केल्या जाणार आहेत. या विशेष मेगाब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. विशेष मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवशांनी प्रवास करणे टाळणे. तसंच अत्यावश्यक असल्यास प्रवास करावे असे आवाहन प्रवाशांना केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.