mumbai local train news  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर 'असा' असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मध्य रेल्वेने रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर लोकल ट्रेन (Local Train) धावणार आहे. तर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत हा मेगाब्लॉक (Mega Block) घोषित करण्यात आला आहे. ( Mumbai Mega Block News In Marathi )

ब्लॉक कालावधित, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. तर भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा योग्य डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. तसेच घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येईल.

हार्बर मार्गावर असा असेल मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तर चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर लाईन सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करिता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. तसेच वांद्रे/गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) या सेक्शनमध्ये विशेष उपनगरीय ट्रेन चालविण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानची गगन भरारी! कला विश्वातील मोठ्या पुरस्कारानं गौरवलं, म्हणाली - "उरी विश्वास बाळगून..."

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरात हिट अँड रन

Mahima Chaudhary Marriage: 52 व्या वर्षी महिमा चौधरीनं उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

Hysterectomy effects: महिलांच्या शरीरातून गर्भाशय काढल्यानंतर कोणते बदल होतात? यामागे कोणती कारणं असतात?

Shocking : Pune: २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आईच्या प्रियकराचं भयंकर कृत्य; मालिश करायला सांगायचा अन्...

SCROLL FOR NEXT