Shreya Maskar
पावसाला सुरूवात झाली आहे. अशात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे बऱ्याचदा चपात्या कडक होतात. त्यामुळे पावसाळ्यात चपाती करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
गव्हाच्या पिठात कोंडा असतो. कोंडा पोषक तत्वांनी समृद्ध असला तरी, कोंडा असलेल्या पिठामुळे चपात्या जाड आणि कडक होऊ शकतात. म्हणून पीठ मळताना कोंडा चाळून काढून टाका. यामुळे मऊ आणि पातळ चपात्या बनतील.
चपात्या बनवण्यासाठी पीठ खूप मऊ असावे. थोडे थोडे पाणी घालून हाताने पीठ मळा. पीठ ताटाला चिकटणार नाही आणि पुरेसे मऊ होईल याची काळजी घ्या, ज्यामुळे उत्तम चपात्या बनतील.
पीठ मळताना तुम्ही थोडे मीठ देखील घालू शकता, ज्यामुळे चपात्या मऊ राहतील. पीठ मळून झाल्यावर त्याला थोडेसे तेल लावा. यामुळे पीठ कोरडे होणार नाही आणि पोळ्या मऊ राहतील.
चपाती लाटण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा घ्या. त्याला कोरडे पीठ लावा आणि नीट लाटून घ्या. पोळी लाटल्यानंतर लगेच तव्यावर ठेवा. लक्षात ठेवा, पोळी जास्त वेळ पोळपाटावर ठेवल्याने ती कडक होते आणि नीट फुगत नाही.
पोळी भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. गॅस वाढवला तर चपाती जास्त फुगणार नाही. पोळी लाटताना जास्त पीठ लागले असेल, तर ते झटकून टाका. पोळीत जास्त कोरडे पीठ घातल्याने ती कडक होते.
मऊ आणि हलक्या पोळ्या बनवण्यासाठी तुम्ही पीठ मळताना त्यात दूध देखील टाकू शकता. थंड दूध चपातीच्या पिठात टाका.
चपात्या पांढऱ्या स्वच्छ कपड्यात ठेवा, जेणेकरून त्या दिर्घकाळ मऊ राहतील. तसेच गरमागरम चपात्या डब्यात भरू नये, कारण त्याला पाणी सुटते आणि त्या नरम होतात.